BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२३

सापडली रे ! अंतराळात आणखी एक पृथ्वी सापडली ...!

 


शोध न्यूज : चांद्रयानाच्या यशाचे गुणगान सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर आली असून अंतराळात आणखी एक पृथ्वी असल्याचा शोध लागला आहे. या ग्रहाला K2-18B एक्सोप्लॅनेट असे नाव देण्यात आले आहे.


चांद्रयानाची सफर यशस्वी केल्याने जागतिक स्तरावर इस्रोचे कौतुक होत आहे, चंद्रावरून काय काय नवी माहिती हाती येत आहे याकडे लक्ष लागले असतानाच अंतराळातील अत्यंत मोठी बातमी पृथ्वीवर येवून पोहोचली आहे. मंगळावर मानवी वस्ती स्थापित करण्यासाठी संशोधक आधीपासूनच परिश्रम घेताना दिसत आहेत आणि एवढ्यात आता दुसरी एक पृथ्वी अंतराळात असल्याचा शोध लागला आहे  नासाला (NASA)  पृथ्वीसारखा दिसणारा ग्रह सापडला आहे. हा ग्रह पृथ्वी पेक्षा 8.6 पट मोठा आहे. एकीकडे चंद्रावर घरासाठी जागा घेण्याच्या गप्पा होत असताना आता या दुसऱ्या पृथ्वीवर देखील प्लॉट खरेदी करण्याच्या गप्पा सुरु होतील कारण या ग्रहावर फक्त पाणी नव्हे तर महासागरं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नासाच्या वेब टेलिस्कोपने K2-18B हा एक्सोप्लॅनेट शोधला आहे आणी ही एक मोठी उपलब्धी आहे. 


पृथ्वीपेक्षाही ८.६  पट मोठा असलेला  एक्सोप्लॅनेट K2-18B . या ग्रहाच्या वातावरणात मिथेन वायू आणि कार्बन डायऑक्साईडशी संबंधित रेणूही सापडले आहेत. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याने याला हायसेन प्लॅनेट असेही म्हंटले जात आहे. या नव्या संशोधनामुळे जगभर मोठी चर्चा सुरु झाली असून नासाचे हे मोठे अंतराळ संशोधन मानले जात आहे. हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल १२० प्रकाशवर्षे दूर असून सौरमालेतील अन्य ग्रहापेक्षा वेगळा आहे.  या नव्याने सापडलेल्या ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे संकेतही मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हैड्रोजन आढळून आले असून पाण्याचेही महासागर आहेत. अमोनिया, मिथेन आणि अन्य वायू तसेच रसायने देखील या ग्रहावर आदली आहेत परंतु तुलनात्मकदृष्ट्या ती कमी आहेत. आढळून आलेले वायू हे जैविक प्रक्रियेच्या कार्यात नक्की किती उपयुक्त असतील हे मात्र अजून निश्चित करण्यात आले नाही.


पाण्याचे महासागर असल्यामुळे मात्र येथे पृथ्वीसारखी जीवसृष्टी असेल अशी शक्यता आहे आणि यावर संशोधन देखील सुरु झाले आहे. येथे जर पृथ्वीसारखी जीवसृष्टी असेल तर या ग्रहावर मानवी वस्ती देखील स्थापन करता येवू शकते. येथे पाणी असल्याबाबत पुरावे मिळालेले आहेत आणि यावरूनच या ग्रहावर सृष्टी असल्याचे मानण्यात आले आहे. (Another Earth found in space) शिवाय या ग्रहावर पृथ्वीएवढेच तापमान असल्यामुळे सजीवासाठी हे पोषक आहे असे देखील फ्रान्सच्या अवकाश अभ्यासक संस्थेकडून सांगण्यात आले आहे. हा ग्रह सूर्यमालेच्या बाहेरचा असून या मालिकेच्या बाहेरच्या ग्रहावर पाणी असल्याचे समोर येणे हे पहिल्यांदाच घडले आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !