BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ मार्च, २०२३

पत्नीने केला पतीचा खून आणि मृतदेह फेकला रेल्वे रुळावर !

 



शोध न्यूज : पंढरपूर येथील एका तरुणाचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला असल्याची बाब उघडकीस आली असून पोलीसाचे हे मोठे यश आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे.


पंढरपूर येथील राम बाग परिसरातील वैभव मगर हा तरुण बेपत्ता झाला.  ७ मार्च रोजी त्याला एक फोन आला आणि तो बाहेर गेला परंतु नंतर तो परत आलाच नाही. तो अचानक कसा आणि कुठे बेपत्ता झाला याची चिंता त्याच्या कुटुंबाला लागली होती आणि पंढरपूर शहर पोलिसात तशी नोंद देखील करण्यात आली होती. त्यानंतर मात्र सांगोला तालुक्यातील मांजरी हद्दीत रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची चौकशी झाल्यावर हा मृतदेह पंढरपूर येथील वैभव मगर याचाच असल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर मात्र कुटुंबीयांनी आक्रोश करीत पंढरपूर शहर पोलिसांकडे धाव घेतली आणि हा खून असण्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्यांना आपला तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा खून असल्याचेच पोलिसांच्या तपासात समोर आले असून पत्नीचेच हे कारस्थान असल्याचे उघडकीस आले आहे. 


पत्नीनेच आपल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने तृतीयपंथीयाच्या मदतीने पती वैभव मगर यांना काटा काढला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकरास पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी शीतल मगर हिने पती बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात देवून आपल्या पतीचे कुणी बरेवाईट केले असण्याची शक्यता व्यक्त करून पतीचा शोध घेतला जावा म्हणून बराच काही 'शो' देखील केला होता. रामबाग झोपडपट्टी परिसराती वैभव मगर धुळवडीच्या दिवशीच सायंकाळी अचानक बेपत्ता झाला होता. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशीच वैभवची  पत्नी शीतल मगर हिने आपला पती हरवला असल्याची खबर पंढरपूर शहर पोलिसांना दिली होती. पोलिसांकडे ही खबर आल्यानंतर त्यांनी लगेच त्याचा तपास सुरु केला.


मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल रेकोर्ड तपासले. याच दरम्यान सांगोला तालुक्यात रेल्वेमार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या तरुणाचे वर्णन बेपत्ता वैभव मगर याच्याशी मिळते जुळते दिसून आले. अखेर हा मृतदेह वैभव याचाच असल्याची खात्री पोलिसांची झाली आणि पोलिसांनी पुढील तपास अत्यंत वेगाने सुरु केला. याप्रकरणी काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती आणि हा खुनाचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त केली होती. याचा तपास तातडीने करण्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांचा तपास या योग्य मार्गाने सुरु होता त्यामुळे लवकरच याचा उलगडा होण्याचे संकेत मिळाले होते. त्याप्रमाणे या खुनाचे रहस्य उलगडले असून पत्नीनेच पतीचा काटा काढला असल्याची बाब समोर आली आहे. 


पोलिसांनी काही माहिती मिळवली आणि लगेच त्यांनी वैभव मगर याच्या पत्नीलाच ताब्यात घेतले. त्यानंतर तिचे आणि अक्षय रमेश जाधव याचे अनैतिक संबंध असल्याचा उलगडा झाला. त्यांच्या या संबंधात वैभव मगर याचा अडथळा होत होता त्यामुळे पत्नी शीतल हिने अक्षय याच्या मदतीने सांगोला मार्गावरील दाते मंगल कार्यालय परिसरात नेले आणि तेथे त्याला ठार मारले. त्यानंतर एका खाजगी वाहनातून त्याचा मृतदेह सांगोला तालुक्यातील मांजरी हद्दीत नेण्यात आला आणि तेथे रेल्वे रुळावर टाकून देण्यात आला. या खुनाचा उलगडा होताच पोलिसांनी वैभव मगर याची पत्नी शीतल मगर आणि अक्षय जाधव यांना अटक केली आहे. (Wife killed her husband, Information disclosed in police investigation) ज्या खाजगी वाहनातून वैभव याचा मृतदेह मांजरीपर्यंत नेण्यात आला होता त्या वाहनाचा चालक अमोल खिलारे हा मात्र बेपत्ता झाला आहे. पोलीस या खिलारेचा शोध घेत आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !