BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ मे, २०२२

आणखी एक धावती कार भर रस्त्यावर पेटली आणि --

 



लातूर : गेल्या काही दिवसात सतत धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत असताना आज लातूरजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात ही कार जळून खाक झाली. 


उन्हाळ्याचे दिवस सुरु असून तापमानात मोठी वाढ होत आहे आणि राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे. उष्माघाताने अनेक बळी जात असतानाच धावती वाहने रस्त्यावरच पेट घेत आहेत. गेल्या दोन महिन्यात अनेक वाहनांना आग लागली आहे. यात प्रवासी बस, ट्रक, कार अशा सगळ्याच वाहनांचा समावेश आहे. लातूर - लामजना रस्त्यावर आज एका कारला अशीच आग लागली. लातूर येथून एका कार्यक्रमासाठी किल्लारीकडे एक कुटुंब या कारमधून निघालेले असताना ही घटना घडली. कार धावत असताना अचानक गाडीने पेट घेतला त्यामुळे कारमधून प्रवास करीत असलेले कुटुंब प्रसंगावधान राखून खाली उतरले त्यामुळे जीवितहानी टळली गेली. (Thrilling incident of burning car) पती पत्नी आणि दोन लहान मुले या कारमधून प्रवास करीत होती. 


वेळीच आणि सावधगिरी बाळगून कारमधील कुटुंब गाडीच्या खाली उतरले परंतु त्यानंतर गाडीची आग भलतीच भडकली आणि काही क्षणात गाडी पूर्णपणे आगीच्या स्वाधीन झाली. अखेर रस्त्यावर ही गाडी जाळून खाक झाली. दरम्यान आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट उसळलेले पाहायला मिळत होते. गाडी जळताना पाहण्याशिवाय कुणाकडेच काही पर्याय उरलेला नव्हता. (The running car caught fire all over the road) उन्हाळ्यात गाडीतून प्रवास करताना काळजी घेणे अत्यावश्यक बनले असल्याचे अनेक घटनातून समोर येत आहे.   


हे देखील वाचा >>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !