BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० मे, २०२२

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे चार सक्रीय रुग्ण !

 



सोलापूर : मुंबई पुण्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे चार सक्रीय रुग्ण असून ही संख्या काही दिवसांपूर्वी शून्यावर पोहोचली होती. मोठ्या शहरातील वाढत्या रुग्णांचा विचार करता वेळीच दक्षता घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. 


सोलापूर शहरातून कोरोना हद्दपार झालेला असून शहरात एकही रुग्ण सक्रीय नाही. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सक्रीय रुग्णांची संख्या शून्यावर आली होती परंतु पुन्हा किरकोळ स्वरुपात रुग्ण आढळताना दिसत आहेत. मुंबई आणि पुणे अशा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे त्यामुळे शासन आणि प्रशासन पुन्हा अलर्ट मोडवर आहे. काही निर्बंध पुन्हा लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यात रुग्णांची वाढ फारशी मोठी नाही परंतु शून्यावर आलेला सक्रीय रुग्णांचा आकडा पुन्हा चार वर गेल्याने तो वाढू नये यासाठी दक्ष राहण्याची मात्र गरज निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सद्या चार रुग्ण सक्रीय आहेत. यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. (Four active patients of Corona in Solapur district) पंढरपूर आणि माढा शहरात प्रत्येकी एक तर सांगोला शहरात दोन रुग्णांचा समावेश आहे. 


कोरोनाची तिसरी लाट ओसरताना सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे मोकळा श्वास घ्यायला मिळाला आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाने दोन वर्षात प्रचंड परिश्रम केले आहेत. ग्रामीण भागातील ११० चाचणीतील  सर्वच्या सर्व अहवाल काल निगेटिव्ह आलेले आहेत तर सोलापूर शहरात झालेल्या ७८ चाचण्यांचा अहवाल देखील निगेटिव्ह आलेला आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे त्यामुळे शासन आणि प्रशासन परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढच्याच महिन्यात पंढरपूर येथील आषाढी यात्रा असल्याने प्रशासन अधिक सतर्क आहे. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात लाखोंची गर्दी होत असते त्यामुळे या काळात कोरोनाचा फैलाव होणार नाही याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते. 


मोठे नुकसान !

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सोलापूर जिल्हा राज्यात सतत आघाडीवर राहिला परंतु कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत गेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने सोलापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान केले आहे, विशेषत: पंढरपूर तालुका या कोरोनाच्या संकटात अधिक गुदमरला आणि सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यातील झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या देखील सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक राहिली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी राहिला त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. चौथ्या लाटेची मात्र टांगती तलवार कायम आहे.   


किरकोळ वाढ !

सोलापूर जिल्ह्याच्या ११ तालुक्यातून कोरोना हद्दपार झाला होता पण पुन्हा काही तालुक्यात किरकोळ स्वरुपात रुग्ण आढळले आहेत.  कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडेच असला तरी सोलापूर जिल्हा हा कायम पहिल्या दहा जिल्ह्यात राहिला आहे. त्यात पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा आणि माळशिरस या तालुक्यांनी प्रशासनाची झोप उडवली होती.  या तालुक्यात अत्यंत वेगाने आणि मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत राहिला आणि प्रयत्न करूनही आटोक्यात येताना दिसत नव्हता. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक बनले आहे.


हे देखील वाचा :>>>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !