BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑक्टो, २०२२

दोन कोटींचा धाडसी सशस्त्र दरोडा, नागरिकांत दहशत !

 



शोध न्यूज : दोन कोटींची रक्कम आणि एक किलो सोने अशी प्रचंड लुट करणारा दरोडा पडल्याने लातूर परिसरात खळबळ उडाली असून चोरते मात्र पसार झाले आहेत. 


चोऱ्यांचे प्रमाण अलीकडे भलतेच वाढलेले असले तरी लातूर शहरातील या दरोड्याच्या घटनेने मात्र सर्वांचीच झोप उडवली आहे. कव्हे नाका रिंग रोड परिसरातील कन्हैया नगरात हा धाडसी दरोडा पडण्याची मोठी घटना घडली आहे. कातपूर रस्त्यावरील राजकुमार अग्रवाल यांच्या घरात पाच दरोडेखोर घुसले आणि त्यांनी विविध शस्त्रांचा धाक दाखवत मोठे घबाड लुटून नेले आहे. मराठी बोलणारे दरोडेखोर मिल्ट्रीच्या कपड्यासारखे जॅकेट आणि  पॅन्ट घातलेले होते. एकूण पाच दरोडेखोर असून यातील तिघांचे वय पंचवीस तीस वर्षांचे होते तर अन्य दोघांचे वय ३५ वर्षादरम्यान होते. यातील चार जणांनी पायात बूट घातलेले होते तर एकाने चप्पल घातलेली होती. अग्रवाल यांच्या घरात घुसून त्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली.


पिस्तुल, कोयता, चाकू अशा विविध शस्त्रांसह आलेल्यांनी शस्त्रांचा धाक दाखवत लुट करायला सुरुवात केली. या दरोड्यात दोन कोटी रुपये रोख आणि एक किलो सोने लुटून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोट्यावधींचा हा दरोडा पडला असला तरी यात कुणालाही काही इजा झाली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास विलंब झाल्याने नेमकी किती रक्कम आणि दागिने लुटले आहेत याचा तपशील हाती आला नाही परंतु कोट्यावधी रुपयांची लुट झाली असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करून दरोडेखोरांना शोधण्यासाठी रवाना केली आहेत. (Armed robbery of crores, terror among citizens) दरोड्याच्या या घटनेने लातूर परिसर हादरून गेला असून पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. 



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !