BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑक्टो, २०२२

राज्याच्या विविध जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा यलो अलर्ट !

 


शोध न्यूज : राज्याच्या विविध भागात आज सकाळपासूनच पाऊस सुरु झाला असून सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.


यावर्षीच्या मान्सूनने परतीचा प्रवास अजून सुरु केला नाही पण तो परतीच्या मार्गावर असतानाच अनेक भागात अतिवृष्टी होऊ लागली आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना जोरदार पाऊस सुरु असून शेतात देखील पाणीच पाणी होत आहे तर कित्येक गावामधून पाणी घुसल्याचे चित्र तयार होऊ लागले आहे. हवामान विभागाने आज पुन्हा राज्यातील बहुतेक भागात पावसाचा अंदाज दिला असून सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी केला आहे. अनेक भागात भल्या सकाळपासूनच पावसाला सुरुवात देखील झाली आहे.


उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  केरळ आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे, त्याचा परिणाम दिसू लागला आहे. पूर्व मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट यासह हा पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


सोलापूर जिल्ह्यासह नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Meteorological department yellow alert for various districts of the state) मान्सून परतीसाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परतीच्या प्रवासाला लागण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !