BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ मे, २०२२

दोन दिवसात मान्सूनचे केरळमध्ये आगमन !

 


उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंददायी बातमी असून दोन दिवसातच म्हणजे २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 


यावर्षी उन्हाळा भलताच कडक असून राज्यात काही भागात उष्णतेची लाट सतत येत राहिली. उष्माघाताचा त्रास देखील अनेकांना झाला आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात धिंगाणा घातला आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील केले आहे. वाढत्या तापमानामुळे पावसाची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली असून आता फार काळ वाट पहावी लागणार नाही. वेळेच्या आधीच अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाला असून आता २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होत आहे. याचाच अर्थ नियमित वेळेच्या आधी मोसमी पाऊस वाटचाल करीत आहे. 


अंदमानात वेळेपूर्वी दाखल झालेला पाऊस पुढे काहीसा थबकला आणि राज्यात वेळेपूर्वी पाऊस येण्याच्या आशा मावळताना दिसत होत्या परंतु पुन्हा मोसमी वाऱ्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आणि पावसाचा प्रवास पुढे जाण्याच्या आशा बळावल्या गेल्या. हवामान विभागाने या आधीच यावर्षी मान्सून वेळेपूर्वी दाखल होत असल्याचे सांगितले आहे. (Monsoon arrives in Kerala in two days)  हवामान विभागाचा हा अंदाज चुकण्याची वेळ आली होती परंतु अखेरच्या क्षणी पावसाचा प्रवास वेळेआधी सुरु झाला आहे त्यामुळे राज्यात देखील वेळेपूर्वी पाऊस येणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. 


हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार २७ मे पासून केरळमध्ये पाऊस सुरु होण्याची अपेक्षा असून यावर्षी राज्यात ९९ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात भरपूर पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. आगामी पाच दिवसात कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. 


महाराष्ट्रात लवकरच !

मोसमी पाऊस २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होत असल्याने महाराष्ट्रात देखील वेळेच्या आधीच पावसाचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.  महाराष्ट्रात दरवर्षी मान्सून दाखल होण्याची ७ जून ही तारीख असते परंतु यावर्षी त्यापूर्वीच मोसमी पावसाचे आगमन होणार आहे. 


पुढील पाच दिवसात --

मान्सून वेळेआधी येणार असला तरी त्या आधी पुढील पाच दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही तासात नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकणार असल्याने हवामान विभागाने सकारात्मक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 


खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !