BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ मे, २०२२

पंढरपूर बस स्थानकावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी !



पंढरपूर : एस टी बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी होण्याची घटना समोर आली असून सदर प्रकार पंढरपूर बस स्थानकात घडला आहे. 


रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून जाण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत तसे बस स्थानकावर बस मध्ये चढताना घाईत असलेल्या प्रवाशांच्या खिशातील पैशाचे पाकीट, मोबाईल तसेच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याचे प्रकारही काही नवे नाहीत. अपेक्षित बस येताच बसमध्ये जागा मिळविण्याच्या हेतून बस मध्ये चढण्यासाठी प्रवाशी घाई करीत असतात. यावेळी प्रवाशात मोठ्या प्रमाणात ढकलाढकली आणि रेटारेटी होत असते. कोण कुणाला ढकलतो आणि कुणाचा कुणाला धक्का लागतो हे कुणी पहात देखील नाही आणि याचाच फायदा चोरटे उठवत असतात. प्रवाशी असल्याचे नाटक करीत प्रवाशांच्या गर्दीत चोर घुसतात आणि या रेटारेटीत सफाईदारपणे चोरी करून हळूच मागे सटकतात. आपली चोरी झाली हे लक्षात येईपर्यंत बराच वेळ गेलेला असतो आणि तोपर्यंत चोरटा तेथून पसार झालेला असतो. 


कोरोनाच्या काळात आणि नंतर राज्य परिवहन कर्मचारी संप यामुळे प्रदिर्ध काळ एस टी बंद होती आणि बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. आता कुठे लालपरी रस्त्यावर धावायला लागली आहे आणि प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबरोबर चोरांचा वावर देखील बस स्थानकाच्या आवारात सुरु झाल्याचे दिसत आहे. पंढरपूर बस स्थानकावर एक महिला एस टी मध्ये चढत असताना तिच्या गळ्यातील पन्नास हजार रुपयांचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. (Mangalsutra stolen from woman's neck at bus stand) इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील  शुभांगी रेवणनाथ यादव पती आणि मुलांसोबत मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथे गेल्या होत्या. नातेवाईकांना भेटून त्या परत आपल्या गावी निघाल्या असता पंढरपूर बस स्थानकावर ही घटना घडली. 


यादव कुटुंब आपल्या गावी परतण्यासाठी पंढरपूर बस स्थानकात आले. काही वेळ बस येण्याची प्रतीक्षा केली आणि त्यानंतर पंढरपूर - अकलूज ही बस येऊन उभी राहिली. अकलूजकडे जाणाऱ्या बस कमी असल्याने अनेक प्रवासी खोळंबले होते आणि ही बस लागताच प्रवासी गर्दी करून बसमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करू लागले. चढणाऱ्या प्रवाशांची गर्दी झालेली असताना यादव कुटुंब देखील या बसमध्ये चढण्याच्या तयारीत होते. याचवेळी शुभांगी यादव यांच्या हातावर मंगलासुत्राचे काही मणी पडले त्यामुळे त्यांचे लक्ष गेले . गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याचे लक्षात आले परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. सदर घटनेबाबत पंढरपूर शहर पोलीसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


हे जरूर वाचा : >>> 


खालील बातमीला टच करा !




अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !