BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ मे, २०२२

भीमा नदीत वाळू ठेक्यावर महिलेचा विनयभंग !

 



मंगळवेढा : भीमा नदीच्या पात्रातील वाळू पॉईंटवर चहा विक्रेत्या महिलेशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर घटनेबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून त्यानुसार तांडोर येथील विठ्ठल मळगे, बबलू राजपूत, वैभव पाटील यांच्याविरोधात घेऊन दाखल करण्यात आला आहे.  मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील भीमा नदीच्या पात्रात चहा विकणाऱ्या चाळीस वर्षे वयाच्या महिलेशी असभ्य वर्तन करण्यात आले. आरोपीनी या महिलेस 'तू मला खूप आवडतेस' असे म्हणत तिच्या हाताला पकडून खाली पडले तसेच जातीवाचक शिवीगाळ केली अशा आशयाची फिर्याद तिघांच्या विरोधात देण्यात आली आहे. आरोपीं चहा विकणाऱ्या महिलेजवळ आले आणि तुझ्याकडे माल आहे काय ? अशी विचारणा केली त्यावर महिलेने, 'कसला माल? मी फक्त चहा बिस्किटे विकते' असे उत्तर दिले.  


त्यानंतर सदर आरोपीनी 'तुला माहित नाही का कसला माल ? तुम्हाला मस्ती आलीय, तुमच्याकडे बघतो' असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली आणि महिलेचा हात धरून 'तू मला खूप आवडतेस' असे म्हणत पिडीतेला खाली पाडले आणि विनयभंग केला . यावेळी तेथे असलेला पिडीतेचा मुलगा मध्ये पडला आई सोडविण्याचा प्रयत्न करू लागला असता त्यालाही धमकावण्यात आले. 'तुझे पाय मोडीन' असे म्हणत त्याला बाजूला ढकलून दिले त्यामुळे तो खाली पडला. (Tea seller molested, case filed against three persons) आरोपींची शिवीगाळ आणि दमदाटी देखील केली असल्याचे सदर फिर्यादीत नमूद करण्यात आले असून अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील करीत आहेत.  



हे जरूर वाचा : >>> 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !