BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मे, २०२२

इंदुरीकर महाराज यांच्या प्रकृतीत बिघाड !



अहमदनगर : प्रख्यात आणि लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून त्यामुळे इंदुरीकर महाराज यांनी आठवड्यातील त्यांचे सर्व कीर्तनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत . इंदुरीकर महाराज यांनीच याबाबत एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. 


इंदुरीकर महाराज यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रातींचा सल्ला दिला आहे त्यामुळे त्यांनी येत्या आठवड्यातील कीर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनासाठी रीघ लागलेली असते आणि अनेकजण त्यांचे कीर्तन आयोजित करण्यासाठी धडपड करीत असतात पण त्यांच्या तारखा मिळत नाहीत एवढे  महाराज व्यस्त असतात. दररोज ते कुठे ना कुठे कीर्तन देत असतात. एका दिवसात दोन आणि प्रसंगी तीन कीर्तनाचे कार्यक्रम ते करीत असतात. त्यांच्या कीर्तनासाठी प्रचंड गर्दी होत असते हे सर्वांनाच माहित आहे. परंतु सतत व्यस्त राहणाऱ्या इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 


डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी २३ मे पासून ३० मे पर्यंतचे किर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आयोजकांची यामुळे मोठी गैरसोय झाली आहे परंतु त्यांनी याबाबत देखील माफी मागितली आहे. उपचार घेतल्यानंतर प्रकृती पूर्ववत होताच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल तोपर्यंत सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असावेत अशी अपेक्षा त्यांनी आपला पत्रकातून व्यक्त केली आहे. (Indurikar Maharaj's health deteriorated) त्यांची प्रकृती ठीक नसली तरी देखील त्यांनी पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. 


अपघातातून बचावले !

ह. भ. प. निवृत्तीमहाराज इंदुरीकर हे काही दिवसांपूर्वी एका अपघातातून बचावले होते. जालन्याच्या परतूर येथे त्यांचा गाडीचा अपघात झाला होता आणि या अपघातात त्यांचा चालक जखमी झाला होता. खांडवी येथे कीर्तनासाठी जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.


सर्व कार्यक्रम रद्द !

प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे त्यामुळे ३० मे पर्यंत असलेले सर्व नियोजित कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. इच्छा असूनही येऊ शकत नाही असे त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले असून दिलीगिरी देखील व्यक्त केली आहे,  इंदुरीकर महाराज यांच्या वतीने एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.    


हे जरूर वाचा : >>> 


खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !