बार्शी : भाजप पुरस्कृत असलेले अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्याच एका कार्यकर्त्याच्या कानाखाली सार्वजनिक ठिकाणी जाळ काढल्याचा व्हिडीओ राज्यभर पहिला जात असून उलट सुलट प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सतत कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. पण आता सुरु झालेली चर्चा ही वेगळीच आहे. आमदारांच्या पाया पडणाऱ्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावण्यात आल्याचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. आणि त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत. क्रिकेटचा सामना सुरु आहे आणि आमदार राजेंद्र राऊत हे आपल्या काही सहकाऱ्यासह बसलेले दिसत आहेत. क्रिकेट सामन्याची कॉमेंट्री देखील ऐकायला येत आहे. असे सगळे व्यवस्थित सुरु असताना एक कार्यकर्ता तेथे येतो आणि आमदार राऊत यांच्या पायावर डोके टेकवतो. (MLA Rajendra Raut slapped the worker) डोके वर घेताच आमदार राऊत हे खाडकन त्याच्या कानाखाली आवाज काढतात असा हा व्हिडीओ आहे.
खरे तर कुणी कुणाच्या पाया पडल्यावर केलेली चूक देखील माफ केली जाते पण इथे मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळते. सदर कार्यकर्त्याला आमदार राऊत यांनी कशासाठी मारले हे या व्हिडीओ मधून स्पष्ट होत नाही परंतु मारलेला हा व्हिडीओ कुणीतरी व्हायरल केला आणि त्याचे पडसाद आधी सोलापूर जिल्ह्यात आणि नंतर राज्यभरात उमटू लागले. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांना राग देखील आला असल्याचे त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियातून दिसून येत आहे. 'कार्यकर्त्याची जागा अशीच असते' इथपासून 'पाया पडायचे तर आई बापाच्या पड बाबा' अशा प्रकरच्या अनेक प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.
कार्यकर्ता आणि कामगार !
म्हणून मला मारले !
हे देखील वाचा :>>>>
खालील बातमीला टच करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !