BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० मे, २०२२

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम केंद्र शासनाने बदलले !

 



नवी दिल्ली : वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करण्यासाठी असलेल्या प्रचलित नियमांत मोठा बदल करण्यात आला असून आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची आता गरज नाही त्यामुळे परवाना प्राप्त करू इच्छिणाऱ्याना मोठा दिलासा मिळाला आहे. 


वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो आणि तो नसला तर मोठ्या कारवाईचा सामना करावा लागतो. वाहन परवाना मिळविण्यासाठी प्रत्यक्ष  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जाऊन वाहन चालविण्याची चाचणी द्यावी लागते आणि एकूण हा सगळा प्रकार त्रासदायक वाटत असतो. खर्चिक आणि त्रासदायक प्रक्रिया यामुळे काही जण वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करणे टाळतात आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावाच लागतो. केंद्र सरकारने मात्र वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करण्यासाठीचे  नियम अधिक सोपे केलेअसून आता चाचणी देणे आवश्यक नाही. शासनाने ड्रायव्हिंग लायसेन्स मिळविण्याच्या नियमात मोठी सुधारणा केली आहे. 


बदल करण्यात आलेल्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसेन्स प्राप्त करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन (RTO Office)  कार्यालयात जावून कसलीही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय रास्त वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जे अद्याप ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यानाही यातून दिलासा मिळणार आहे. (central government changed the rules of driving license) वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करण्यासाठी आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हींग ट्रेनिंग स्कूलमध्ये लायसन्सकरिता नोंदणी केली जाऊ शकते आणि परवाना प्राप्त करता येऊ शकतो. 


उत्तीर्ण व्हावेच लागणार !
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन टेस्ट देण्याची गरज नसली तरी ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे. ड्रायव्हींग ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेऊन सदर संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्याना त्या प्रमाणपत्राच्या आधारे वाहन चालविण्याचा परवाना दिला जाणार आहे. 


एक महिन्याचा काळ 
वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेसाठी सरकारने नवीन नियमावली जारी केली असून त्यानुसार हलकी मोटार वाहने चालविण्यासाठी कोर्स करण्याचा कालावधी हा अधिकाधिक चार आठवड्याचा करण्यात आला असून प्रशिक्षकाला पाच वर्षाचा ड्रायव्हींगचा अनुभव असावा आणि तो १२ वी उत्तीर्ण असावा लागणार आहे. 


एक एकर जागा हवी 

नव्या नियमानुसार दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहने यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्राच्या जवळ कमीतकमी एक एकर जागा असणे नियमानुसार बंधनकारक करण्यात आले आहे तसेच मध्यम व जड प्रवासी, मालवाहू वाहन अथवा ट्रेलर यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्राजवळ दोन एकर जमीन असणे बंधनकारक करण्यात आले आहे. 


दोन टप्प्यात अभ्यासक्रम 
नव्या नियमानुसार ड्रायव्हींग स्कूलचा अभ्यासक्रम दोन टप्प्यात विभागण्यात आला असून थेअरी आणि प्रॅक्टिकल अशी विभागणी करण्यात आली आहे. थेअरी टप्प्यातील संपूर्ण अभ्यासक्रम आठ तासांचा असणार आहे तर ग्रामीण रस्ते, सामान्य रस्ते, शहरातील रस्ते, महामार्ग, पार्किंग आणि रिव्हर्सिंग, चढ उतारावर वाहन चालवणे यासाठी २१ तासांचा अभ्यास बंधनकारक केला गेला आहे. 


हे देखील वाचा :>>>>







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !