BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ मे, २०२२

मान्सून केरळमध्ये दाखल, लवकरच महाराष्ट्रात !

 



मान्सूनच्या आगमनाचे अंदाज पुढे मागे होत असतानाच आता हवामान विभागाने ताजी माहिती दिली असून मान्सूनचे आगमन केरळमध्ये झाले आहे आणि आता लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे.


यावर्षी मान्सून नियमित वेळेच्या आधीच दाखल होईल असा अंदाज आधीपासून वर्तवला जात असून त्याप्रमाणे तो अंदमानात दाखल झाला पण केरळमध्ये मात्र या अंदाजाप्रमाणे तो दाखल झाला नाही. हवामान खात्याचा हा अंदाज चुकल्याचे देखील समोर आले आणि पाऊस काही दिवस लांबणीवर पडणार असे चित्र निर्माण झाले. हवामान विभागाच्या अंदाजाबाबत उलट सुलट प्रतिक्रिया देखील समाजमाध्यमावर उमटू लागल्या होत्या पण आता पुन्हा दिलासादायक आनंददायी बातमी आली आहे. पश्चिमेकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे मान्सून गतिमान झाला आणि तो केरळमध्ये दाखल झाला आहे. 


हवामान खात्याने ही आनंदाची माहिती दिली असून श्रीलंकेच्या वेशीवर मान्सून थांबला होता आणि आता तो पुढच्या प्रासाला निघाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यामुळे मान्सून आता ५ जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल असा नवा अंदाज आता हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरवर्षी १ जून रोजी केरळात मान्सून दाखल होतो परंतु यावेळी वेळेच्या आधीच तो दाखल झाला असून महाराष्टात देखील नियमित वेळेच्या आधीच तो पोहोचणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Monsoon arrives in Kerala) केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो सात दिवसात महाष्ट्रात येत असतो, सुरुवातीला तळ कोकणात त्याचे आगमन होते आणि त्यानंतर तो हळूहळू संपूर्ण राज्य व्यापत असतो. यावेळी मात्र तो काहीसा लवकर आलेला आहे.


७ जून पर्यंत पुण्यात !
मान्सून ५ जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर साधारण तीन ते चार दिवसात मुंबईपर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !