BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मे, २०२२

पोलिसांना मारहाण करून कोठडीतील पाच आरोपी पळाले !




सातारा : पोलिसांना मारहाण करून दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी कोठडीतून पळून गेल्याने सातारा जिल्ह्यात आणि पोलीस दलात एकाच खबाल उडाली आहे. 


गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलीस मोठ्या कष्टाने पकडून त्यांना तुरुंगात डांबत असतात पण थोड्याश्या निष्काळजीपणामुळे ते पोलिसांच्याच हातावर तुरु देवून पळून जातात. पोलिसांच्या तावडीतून आणि कोठडीतून देखील आरोपी पळाल्याच्या अनेक घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत आणि पळालेल्या आरोपींना पुन्हा पकडलेही जात असते. तरीही मोठ्या गुन्ह्यातील आरोपी कोठडी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतात आणि अनेकदा यशस्वी देखील होतात. अशा घटना घडल्यामुळे पोलिसांनी केलेल्या कष्टावर पाणी तर पडतेच पण पोलीस दल बदनामीला देखील सामोरे जात असते. सातारा जिल्ह्यातील औंध येथील पोलीस आता याच तणावात आलेले आहेत. 


दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांनी गजाआड केले होते. औंध पोलिसांच्या ताब्यात ते त्यांच्याच पोलीस कोठडीत होते परंतु कोठडी तोडून पळून जाण्यात पाच संशयित आरोपी यशस्वी झाले आहेत आणि पोलीस मात्र आता घाम पुसू लागले आहेत. पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण करून हे आरोपी पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे आज राज्याचे गृहमंत्री सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली असल्याने पोलीस अधिकच तणावात गेले आहेत. (Five accused escaped from the police cell) पोलीस कोठडीचे दार तोडून दरोड्यातील पाच संशयित आरोपींनी पोलिसांना मारहाण केली आणि पोलीस ठाण्याच्या आवारातून पळ काढला आहे. 


संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी नुकतीच अटक करून लॉकअप मध्ये ठेवले गेले होते. पहाटेच्या वेळेस परिस्थितीचा अंदाज घेत या आरोपींनी पळून जाण्याचा डाव साधला आहे. ही घटना घडताच वरिष्ठ अधिकाऱ्या सह सगळ्यांनाच धक्का बसला असून पळून गेलेल्या या पाच दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. 


पळालेले आरोपी 
सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले अशी या पळालेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. हे पाचही आरोपी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.  


माहिती मिळाली 
पोलिसांच्या कोठडीतून पळून गेलेले आरोपी हे वरुड सिद्धेश्वर कुरोली परिसरात असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्यांना पकडून पुन्हा तुरुंगात डांबण्याच्या तयारी असून त्यांना यश येण्याची शक्यता आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !