BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ मे, २०२२

दहावी बारावी परीक्षेचा निकाल पुढील महिन्यात !




पुणे : दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक यांना प्रतीक्षा असतानाच हा निकाल आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बारावीचा निकाल १० जूनपर्यंत तर दहावीचा निकाल २० पर्यंत  घोषित केला जाणार आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत आज अधिकृत माहिती दिली असून परीक्षेच्या पेपरची तपासणी जवळपास पूर्ण झाल्याने पुढील महिन्यात हा निकाल घोषित करण्यात येणार आहे. दरवर्षी हे निकाल मे महिन्याच्या अंतिम सप्ताहात किंवा जून महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या सप्ताहात जाहीर केले जातात. यावर्षी राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दहावी आणि बारावी परीक्षा सुरु असतानाच हा इशारा देण्यात आला होता शिवाय कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या प्रतिनिधींनी दहावी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासताच परत केले होते.

 
अशा परिस्थितीमुळे दहावी आणि बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली गेली होती परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आणि त्यामुळे दोन्ही परीक्षांच्या पेपरचे तपासणीची काम सुरळीत सुरु झाले. (SSC, HSC examination Result next month) कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद होती त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु होते. विशेष मुल्यांकन पद्धतीने विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आला होता परंतु यावेळी ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या त्यामुळे निकाल काहीसा उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत होती परंतु आता दहावीचा निकाल २० जून पर्यंत तर बारावीचा निकाल १० जून पर्यंत घोषित होऊ शकतो.

 
परीक्षा उशिरा तरीही 
कोरोनाच्या परिस्थितीमुले परीक्षा घेण्यात उशीर झाला असला तरी सर्व विभागाचे पेपर तपासून झाले आहेत अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने दिली आहे. पेपर तपासून झाले असल्यामुळे हे निकाल लवकरच लागण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. परीक्षा उशिरा झाल्याने वेळत निकाल लावणे हे एक आव्हान असले तरी शिक्षण महामंडळाने ते पेलले असल्याचे दिसत आहे.

  
तारखेबाबत घोषणा नाही 
दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाबाबत अद्याप तारखेची कोणतीच घोषणा करण्यात आली नसली तरी दहावी परीक्षेचा निकाल २० जूनपर्यंत आणि बारावीचा निकाल १० जून पर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता मात्र व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.   


हे देखील वाचा >>>




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !