BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ मे, २०२२

शेतकरी ऊसात, चोर घरात ... चार लाखावर डल्ला !

 



टेंभुर्णी : अंधाऱ्या रात्रीही शेतकरी ऊसाला पाणी देण्यासाठी शेतात गेला आणि इकडे घरात चोर घुसले आणि चार लाखांचा डल्ला मारून निघून देखील गेले. माढा तालुक्यातील सापटणे येथे ही घटना घडली.


शेतकरी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतात राब राब राबत असतो, पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच वीज मिळत असल्यामुळे तो मध्यरात्रीही शेतात जाऊन पिकांना पाणी देत असतो. सर्पदंश होण्याची सतत भीती असते तरीही तो धाडसाने आणि नाईलाज म्हणून रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी  देत असतो. शेती हेच त्याचे उपजीविकेचे साधन असते त्यामुळे संकटे अंगावर घेत तो चार पैसे गाठीला येथील म्हणून राबत असतो पण अशा शेतकऱ्याच्या घरात शिरून चोरट्यांनी चोरी केली आहे. रात्री उठून शेतकरी उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेला आणि घरात मात्र चोरट्याने डल्ला मारला. 


माढा तालुक्यातील सापटणे येथील शेतकरी नारायण साखरे हे मध्यरात्री दोन वाजता उठले आणि उसाला पाणी देण्यासाठी शेतावर गेले. जाताना त्यांनी घराचा दरवाजा बंद केला नाही आणि याचाच चोरट्यांनी फायदा उठवला. अकलूज येथील एक कार्यक्रमास जाऊन साखरे कुटुंब गावी परतले होते. परतण्यास उशीर झाल्याने यातील काही जण सापटणे गावातच थांबले तर नारायण साखरे, त्यांचे आई वडील आणि पत्नी हे शेतातील घरी गेले होते. (Farmers in sugarcane, thieves in the house) नारायण साखरे यांची आई व पत्नी घरातील आतल्या खोलीत झोपले तर वडील बाहेरच्या बाजूस झोपले होते. नारायण यांनी शेतात जाताना दरवाजा उघडाच ठेवला आणि ते जाताच त्याच दरवाजातून चोरटे घरात घुसले. 


पावणे चार लाखांची चोरी 
नारायण साखरे हे शेतात जाताच घरात घुसलेल्या चोरांनी कपाटातील रोख ७० हजार रुपयांची रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिने असा ३ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. चार पैसे गाठीला यावेत म्हणून पिके जोपासण्यासाठी अपरात्री शेतकरी रानात गेलेला असताना त्यांच्या घरातील लाखोंचा ऐवज लुटण्यात आला.


एक चोर दिसला पण --
घराबाहेर झोपलेले नारायण साखरे यांचे वडील गोपाळ साखरे हे रात्री जनावरांना वैरण टाकण्यासाठी उठले असता त्यांना एक चोर दिसला. चोराला पाहून ते मोठ्याने ओरडले. त्यांच्या आवाजाने घरातील महिलाही जाग्या झाल्या. त्यांनीही आरडओरडा सुरु केला. त्यांचा आवाज ऐकून शेतातील नारायण साखरे हे घराकडे आले पण तोपर्यंत चोर तेथून पसार झाले होते.       


हे देखील वाचा :>>>>

खालील बातमीला टच करा !



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !