सांगली : नवऱ्याला विष घालून मारण्याचा तब्बल तीन वेळा प्रयत्न केला पण तिसऱ्यांदा बिंग फुटले आणि लाडाने गुलाबजामून खाऊ घालणाऱ्या बायकोला तुरुंगात बसावे लागले असल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे.
पती पत्नीचे नाते अत्यंत विश्वासाचे असते पण कधी कधी या नात्याला देखील कलंक लावला जातो. पत्नी जीवापाड प्रेम आपल्या पतीवर करीत असते आणि सतत त्याच्या आरोग्याची देखील चिंता करीत असते. पतीही आपल्या पत्नीला सुख मिळावे. आपल्या मृत्युनंतरही पत्नीला कसली चिंता राहू नये याची व्यवस्था तो मृत्युपूर्वी करीत असतो. घट्ट वीण असलेल्या या नात्यात काही घटना अशा घडतात की या नात्यावरील विश्वासाला धक्का लागतो. पत्नी सुपारी देवून आपल्या पतीचे आयुष्य संपवत असल्याच्याही अनेक घटना समोर येतात पण सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील एका घटनेने या नात्याला जोरदार धक्का दिल्याचे समोर आले आहे. पत्नीने तीन वेळा नवऱ्याला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला (The wife poisoned her husband three times) पण सुदैवाने नवरा बचावला.
आयुष्याची दोरी बळकट असलेले प्रसन्ना खंकाळे यांनी इस्लामपूर पोलिसात या घटनेबाबत फिर्याद दिली आहे त्यानुसार, पत्नीने पतीच्या जेवणात तीन वेळा विष घातले पण प्रत्येक वेळी नवरा यातून बचावला आहे. सुरुवातीला जेवणाच्या डब्यात विष कालवले तर दुसऱ्यांदा चहामध्ये फिनेल मिसळले आणि तिसऱ्या वेळेस चक्क गुलाबजामूनमध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळून आपल्याच नवऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न पत्नी गौरी खंकाळे हिने केला असल्याचे म्हटले आहे. या तीनही वेळा प्रसन्ना आपल्या पत्नीच्या मोठ्या कारस्थानातून बचावला आणि पत्नीचे बिंग फुटताच तिला तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली.
बायकोने आग्रह केला आणि --
नवऱ्याला विष घालून मारण्याचा दोन वेळा केलेला प्रयत्न असफल झाल्यावर गौरी खंकाळे हिने मोठ्या प्रेमाने नवऱ्याला गुलाबजामून खायला दिले. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तिने हे कारस्थान केले पण गुलाबजामून खाताना प्रसन्ना यांना त्यात बुरशीच्या औषधासारखे तुकडे दिसले, त्यानंतरही ते गुलाबजामून खाण्याचा आग्रह गौरी करीत होती. या आग्रहावरून प्रसन्ना यांना शंका आली आणि सगळे बिंग फुटले.
पत्नीची कबुली !
शंका बळावल्याने प्रसन्ना यांनी खडसावून गौरीकडे विचारणा केली. आपले कारस्थान उघडे पडल्याची जाणीव गौरीला झाली आणि ती घाबरून गेली. तिने सरळ नवऱ्याकडे कबुली दिली आणि यापुढे असे करणार नाही असे म्हणत माफी देखील मागू लागली. पत्नीने गुलाबजामूनमध्ये उंदीर, घुशी मारण्याचे औषध घातले होते हे कळल्यावर पतीला धक्काच बसला !
पत्नी तुरुंगात !
आपल्या जीवावर उठलेल्या पत्नीला माफ करण्याचा विषयच नव्हता. प्रसन्ना यांनी थेट इस्लामपूर पोलीस ठाणे गाठले आणि पत्नीविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रसन्नाच्या कारस्थानी बायकोला गजाआड केले. गुलाबजामूनमध्ये विष घालण्यापूर्वी दोनदा तिने हा प्रकार केल्याचे उघडकीस आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. तीन वेळा विषप्रयोग करूनही पती मात्र सुर्दैवाने बचावला ! पत्नीवर मात्र पतीची हत्या करण्याचा (Attempt to Murder) प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !