सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलेले असून शेडनेट मधील द्राक्षांचा अक्षरश: चिखल झाल्याची बाब समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जवळपास सर्वच तालुक्यात हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस म्हटलं की शेतकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शेतकरी धास्तावलेला असून अजूनही अवकाळी पाउस होणार असल्याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करीत आहे. अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, माळशिरस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर अशा काही तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात फटका दिलेला आहेच पण दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भागातील पावसाने बंकालगी यथील शेतकरी माणिकराव देशमुख यांना खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याचे आता समोर आले आहे.
वादळी वारा घेवूनच या भागात पावसाने हजेरी लावली त्यामुळे पिकांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकरी बांधवावर आली असताना बंकालगी येथील शेतकरी देशमुख यांच्या शेडनेट मधील द्राक्षांचा अक्षरश: चिखल झाला आहे. वाऱ्याने द्राक्षांचे नुकसान तर केलेच पण शेडनेटचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने सुमारे अडीच हजार किलो द्राक्षांचा चिखल झाला असून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. (Loss of farmers due to unseasonal rains) संकटाच्या काळात एवढे मोठे नुकसान सहन करण्यापलीकडचे असल्यामुळे शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
हे देखील वाचा : >>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !