पुणे : सोलापूर जिल्ह्यासह राज्यात बहुतेक ठिकाणी उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उन्हाळ्याची तीव्रता आणि तपमान वाढत असताना अधूनमधून येत असेलल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना हवामान खात्याने आणखी चिंता वाढवली आहे. उन्हाळा आणि उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच काल सायंकाळी वातावरणात बदल झाला होता. अचानकपणे पावसाची परिस्थिती तयार झाली होती. शिवारातील पिके आणि द्राक्षांच्या बागा अंतिम टप्प्यात असताना पावसाचा हा अंदाज शेतकरी वर्गाच्या काळजाचा ठोका चुकवत असून उद्यापासूनच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजात राज्यातील बहुतेक जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसणार असल्याचे दिसत आहे. दिनांक २१ ते २३ एप्रिल पर्यंत राज्यातील अनेक भागात वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दिनांक २१ आणि २२ रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे तर बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता असल्याचे या अंदाजात सांगण्यात आले आहे. यापैकी काही जिल्ह्यात २३ एप्रिल रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामानशास्त्र विभागाचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.(Chance of two days unseasonal rain in the state) भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेले हवामान अंदाज गेल्या काही काळात खरे ठरेले आहेत.
तापमानात वाढ !
वर्धा, चंद्रपूर, अकोला या परिसरात तपमान अधिक वाढू लागले असून काल या शहरातील तापमान ४४.८ अंश सेल्सियस एवढे नोंदण्यात आले आहे. यावर्षीचे हे सर्वाधिक तापमान असून राज्याच्या सर्वच भागात सरासरी कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा देखील त्रास जाणवू लागला आहे.
म्हणून अवकाळी पाऊस
बंगाल उपसागारापासून उत्तर तामिळनाडू तसेच दक्षिण पश्चिम गुजरात इथपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्राच्या भागातही चक्रीय स्थिती वाढलेली आहे. या स्थितीचा परिणाम म्हणून २१ आणि २२ एप्रिल रोजी राज्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕ पंढरपूर तालुक्यातून कुख्यात दरोडेखोराला अटक !
- ⭕ सोलापूर - पुणे महामार्गावर मोठा अपघात !
- ⭕ पंढरीत अपघात, प्रतिष्ठित व्यापारी ठार !
- ⭕पंढरीत गुणरत्न सदावर्तेविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !