सांगोला : स्विमिंग टॅंकमध्ये पोहायला गेलेल्या अठरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्विमिंग टॅंक चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला (Sangola accident) असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांच्या नातेवाइकानी केला आहे.
नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या अठरा वर्षे वयाच्या पृथ्वीराज प्रमोद कोडग या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीराज हा मुलाचा जत तालुक्यातील निगडी येथील असून तो आपल्या कुटुंबासह सांगोला येथे रहात होता. सांगोला येथे एका स्विमिंग टॅंकमध्ये तो मित्रांसोबत पोहायला गेल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. पृथ्वीराज हा सांगोल्याच्या या स्विमिंग टॅंकमध्ये अधून मधून पोहण्यासाठी जात असायचा. आजही तो आपल्या मित्रांसोबत पोहायला गेला. पृथ्वीराज हा पाण्यात गेला परंतु बराच वेळ झाला तरी बाहेर आला नाही त्यामुळे ही माहिती त्याच्या मित्राने स्वामिंग टॅंक चालकास दिली. अचानक तो दिसेनासा झाल्याने टॅंकवर एकच खळबळ उडाली.
टॅंक चालकाला ही माहिती दिल्यानंतर चालकाने सीसीटीव्ही फुटेज पाहायला सुरुवात केली. पृथ्वीराज हा बाहेर गेला आहे काय? याची तपासणी करण्यात आली. त्याचे कपडेही टॅंकवरच दिसत होते आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर देखील तो बाहेर गेला नसल्याची खात्री झाली. अखेर त्याच्या शोधासाठी स्विमिंग टॅंकमधील पाण्याचा उपसा करण्यात आला त्यानंतर पृथ्वीराज याचा मृतदेह आढळून आला. (Student drowns in swimming tank) या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून स्विमिंग टॅंक चालकाच्या निष्काळजीपणाचे आरोप देखील होऊ लागले आहेत. सांगोला शहराच्या बाहेर असलेल्या या टॅंकमध्ये अनेकजण पोहोण्यासाठी जातात तसेच येथे लहान मुलांच्या सहलीही जात असतात.
हे देखील वाचा :
- झाडाची फांदी तोडताना विजेचा धक्का लागून मृत्यू !
- अपघात झाला आणि अजितदादांचा ताफा थांबला !
- पोलिसाने घडवली मायलेकराची भेट !
- पंढरपूर तालुक्यात दरोड्याच्या आधीच पडल्या बेड्या !
- पंढरपूर तालुक्यात माजी सैनिकाचे घर फोडून चोरी !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !