BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० एप्रि, २०२२

दरोड्याच्या आधीच पडल्या बेड्या !


 करकंब : पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा घालण्याआधीच तीन दरोडेखोरांच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. वेळीच त्यांना पकडल्यामुळे दरोड्याचा (Robbery) मनसुभा उधळला गेला आहे.

 

अलीकडे शहरासह ग्रामीण भागातही चोरी आणि दरोडे यासारखे गुन्हे वाढताना दिसत असून पोलीस अनेक गुन्ह्यांची उकल देखील करीत आहेत परंतु चोर आपले प्रताप थांबवताना दिसत नाहीत. करकंब पोलिसांनी मात्र दरोडा पडण्यापूर्वीच सतर्कता दाखविल्याने एक गुन्हा घडण्यापूर्वीच संशयित आरोपींच्या हातात बेड्या पडल्या आहेत.  टेंभुर्णीकडून एक पांढऱ्या रंगाची कार घेऊन काही संशयित करकंबच्या दिशेने येत असल्याची माहिती करकंब येथील गस्तीवरील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जळोली चौकात त्यांना रोखण्याची तयारी केली. टेंभुर्णीकडून करकंबकडे येणारी वाहने तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली असता अपेक्षेप्रमाणे पांढऱ्या रंगाची एक कार तेथे आली. 


पोलिसांनी या कारला थांबण्याचा इशारा करताच कार थांबली पण दोघे जण लगेच तेथून निसटले. पोलिसांनी वेळीच तिघांना जेरबंद केले त्यामुळे त्यांना पळता आले नाही. त्यांची तपासणी केली असता दादा बापू खंडागळे (रा. उपळवाटे ता. माढा ) याच्या खिशात लाल रंगाची चटणीची पुडी आढळून आली. गाडीच्या डिक्कीत लोखंडी गज, कटावणी असे दरोड्याचे साहित्य दिसून आले. पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळी येथील श्रीकांत शामराव पाटील, माढा तालुक्यातील दादा खंडागळे, शहादा तालुक्यातील लोहारा कर्जत येथील हिम्यास मोतीसिंग ठाकरे यांच्या मुसक्या आवळल्या. (Accused were caught by the police before the robbery) दरोड्यापुर्वीच त्यांच्या हातात बेड्या पडल्या असून पळालेल्या दोघांच्या शोधात पोलीस आहेत. 



हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !