मुंबई : विजेच्या बिलांनी शेतकऱ्यांना त्रस्त केल्यानंतर आता घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांना देखील वीज दर वाढीचा शॉक दिला जाणार असून महाराष्ट्र वीज नियामक मंडळाने वीज दर वाढविण्याची परवानगी दिली आहे.
थकीत वीज बिलांसाठी ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा सपाटाच महावितरणने लावला होता त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले होते. अखेर शेतकऱ्यांचा असंतोष लक्षात घेवून ही कारवाई काही काळापुरती का होईना थांबविण्यात आली आहे परंतु आता घरगुती ग्राहकांना वीज दर वाढीचा शॉक बसणार आहे. उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी आणि अघोषित भारनियम यामुळे उन्हाळ्यात घरगुती ग्राहक देखील वैतागू लागले असतानाच दरवाढीचा शॉक बसणार आहे. विजेच्या बिलात वीज वापरापेक्षा अन्य आकारच अधिक येत असल्यामुळे ग्राहक सतत तक्रारी करीत असताना आता आणखी बोजा ग्राहकांवर पडणार आहे. वेगवेगळ्या महागाईने सामान्य माणूस त्रस्त झालेला असताना त्याच्या डोक्यावर आणखी एक बोजा पडणार आहे.
कोळसा तसेच गॅस यांच्या किमती प्रचंड वाढू लागलेल्या असून महाराष्ट्र वीज नियामक मंडळाने सगळ्याच वीज कंपन्यांना विजेचे दर वाढवण्यास परवानगी दिली आहे. यात महाराष्ट्राचा देखील समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता वीज दर वाढ अटळ आहे. आता प्रतियुनिट १० ते २५ पैसे अधिक द्यावे लागणार आहेत. १०० युनिट पर्यंत १० रुपये तर ३०० युनिट वीज वापरापर्यंत ६० रुपयांचा वाढीव फटका आता महावितरण ग्राहकांना बसणार आहे. मार्च महिन्यात वापरलेल्या घरगुती विजेवर देखील बोजा सहन करावा लागणार आहे. डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यानच्या वीज खरेदीवरील अतिरिक्त खर्च ग्राहकाकडून वसूल केला जाणार असून मार्च ते मे या महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजन आकार लागू करण्यात येणार आहे त्यामुळे येणाऱ्या वीज बिलाचा आकडा शॉक देणारा ठरणार आहे.
सद्या येत असलेल्या बिलामुळे ग्राहक वैतागलेले असून वीज बिलातील इतर वसुली ही जाचक वाटत आहे. वेगवेगळे प्रकारचे आकार आणि मीटर भाडे वसुली वीज ग्राहकांना आधीच मान्य नाही त्यात आता अतिरिक्त वसुली ग्राहकांना हैराण करणारी ठरणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांच्या दरात विक्रमी वाढ झालेली असून रोज ही दरवाढ पुढील विक्रम प्रस्थापित करत असताना आता वीज देखील महाग होणार असल्याने ( Shock of domestic electricity price hike) सामान्य नागरिकांचे आधीच कोलमडलेले बजेट पुरते विस्कटून जाणार आहे. कोळसा दर वाढीमुळे १० ते ६० रुपयांचा बोजा आता वीज बिलात वाढणार आहे.
हे देखील वाचा :
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !