पंढरपूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरीच्या घटना सुरूच असून रोपळे येथील माजी सैनिकांच्या घराचे कुलूप तोडून पाच लाखांची चोरी झाल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागात चोरांची दहशत निर्माण झाली आहे .
पंढरपूर शहर आणि तालुक्यात सतत चोरीच्या घटना घडत आहेत. नागरिक घराला कुलूप लावून गेले की रात्री ते घर फोडले जात आहे शिवाय भर रस्त्यावर देखील काहीतरी बहाणा करून किंवा पोलीस असल्याची बतावणी करून दिवसाढवळ्या लुटले जात आहे. कुठल्याही मार्गाने चोरीच्या घटना घडत आहेत. घरात शिरून धाक दाखवत देखील चोरी होऊ लागली आहे. यातील काही घटना पोलिसांच्या पर्यंत पोहोचतात तर काही घटना केवळ चर्चेत उरतात. गेल्या काही दिवसात ग्रामीण भागातील चोरीच्या घटना कमी झाल्या असल्याचे दिसत होते परंतु रोपळे येथे माजी सैनिकाच्या घराचे कुलूप तोडून पाच लाखांची चोरी करण्यात आल्याने चोरांचे आस्तित्व पुन्हा दिसून आले आहे.
रोपळे येथील माजी सैनिक हे घराला कुलूप लावून अंगणात झोपलेले होते. त्यांच्या पत्नी या परगावी गेलेल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. घरात उकाडा असल्यामुळे अनेकजण गच्चीवर अथवा अंगणात झोपू लागले आहेत. माजी सैनिक हे देखील आपल्या घराच्या अंगणात झोपले होते आणि घराला कुलूप लावले होते. पहाटेच्या दरम्यान त्यांना जाग आली असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले त्यांना दिसून आले.
दरवाजाचे तुटलेले कुलूप पाहून त्यांना घरात चोरी झाल्याचा अंदाज आला. त्यांनी घरात पहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले आणि एकूण प्रकारची जाणीव त्यांना झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाट उचकटून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. सोन्याच्या पाटल्या, गंठण, कर्णफुले, नेकलेस, अंगठ्या, कानातील रिंग वगैरे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. रोख रक्कम ४६ ह्जारासह एकूण ५ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील वाचा :
- घरात घुसून मारू, खवळली बारामती !
- नामवंत किर्तनकाराच्या अश्लील व्हिडीओने भक्तांना धक्का !
- दिवसा नागाला मारले, रात्री नागीन चावली !
- पंढरीतून परीक्षा संपताच दोन मुली बेपत्ता !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !