सोलापूर : झाडाची फांदी तोडताना खाली शिडी धरून थांबलेल्या विजेचा शॉक लागून एका वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा कामगार फेकला गेल्याने बचावला आहे. (electric shock) फांदी तोडण्यासाठी वर चढलेल्या कर्मचाऱ्याचा स्पर्श विद्युत तारेला झाल्याने ही दुर्घटना घडली.
झाडे वाढून विजेच्या तारांमध्ये गेल्याचे प्रकार जागोजागी दिसतात. जमिनीपासून विविध वेळी विजेच्या खांबावर चढतात आणि विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या तारांपर्यंत या वेळी जात असतात. विजेच्या तारांच्या खालच्या बाजूस वाढलेली झाडे वाढत त्याच्या फांद्या विजेच्या तारापर्यंत पोहोचलेल्या असतातच पण बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्याही विजेच्या तारांना स्पर्श करीत असतात. अशा प्रकारामुळे सतत धोका असतो परंतु वीज वितरण कंपनी अशा प्रकाराकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे फांदीतून विजेचा प्रवाह उतरून प्राण जाण्याचा धोका असतो. वारे वाहू लागले की या फांद्या विजेच्या तारांना घासून ठिणग्याही उडतात आणि अनेकदा विद्युत प्रवाहित तारा तुटून खाली पडण्याचाही धोका असतो.
सुभाष नरहरी भरगंडे हे ७५ वर्षांच्या वयात देखील तांदूळवाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर काम करीत होते. या पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूस असलेल्या झाडाची फांदी विजेच्या तारांना स्पर्श करीत होती त्यामुळे ठिणग्या उडत होत्या. पेट्रोल पंपाच्या जवळ अशा ठिणग्या उडणे धोक्याचे असल्याने ही फांदी तोडणे आवश्यक बनले होते. ही फांदी कापून काढण्यासाठी सुभाष भरंगडे आणि अन्य एक कर्मचारी गेले. शिडीवरून कर्मचारी वर चढला आणि भरगंडे हे शिडी पकडून खाली थांबले होते. विजेच्या तर जवळ असताना आणि झाडाची फांदी विद्युत प्रवाह असलेल्या तारांना स्पर्श करीत असताना त्यांनी कसलीही खबरदारी घेतली नाही की वीज कंपनीला कळवून विद्युत पुरवठा बंद केला नाही. अखेर या बेपर्वाईने एका वृद्ध कामगाराचा जीव घेतला.
शिडीवरून वर चढलेल्या कर्मचाऱ्यास विजेचा शॉक लागला. फांदी कापण्याच्या प्रयत्नात असताना या कर्मचाऱ्याचा विजेच्या ताराना स्पर्श झाला त्यामुळे ते फेकले गेले. विजेचा धक्का लागताच तो कर्मचारी खाली फेकला गेला पण दरम्यान शिडीतून विद्युत प्रवाह उतरला आणि खाली शिडी धरून थांबलेल्या भरगंडे यांना जोराचा विजेचा धक्का बसला. हा धक्का बसताच ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Death of a worker due to electric shock)या घटनेची सोलापूर सिव्हील चौकीत नोंद करण्यात आली आहे.
धडा घेण्याची गरज
झाडाच्या फांद्या विजेच्या तारांना स्पर्श करीत असताना अनेकजण झाड अथवा फांद्या तोडण्याचा प्रयत्न करतात. अविचाराने हे काम करणे किती धोक्याचे आहे हेच या घटनेने दाखवून दिले आहे. या घटनेतून बोध घेवून अशा प्रकारापासून दूर राहण्याचा धडा घेण्याची गरज आहे.
हे देखील वाचा :
- अपघात झाला आणि अजितदादांचा ताफा थांबला !
- पोलिसाने घडवली मायलेकराची भेट !
- पंढरपूर तालुक्यात दरोड्याच्या आधीच पडल्या बेड्या !
- पंढरपूर तालुक्यात माजी सैनिकाचे घर फोडून चोरी !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !