मुंबई : कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाच केंद्र शासनाने राज्यांना नियम पालनाच्या सूचना दिल्या असल्याने राज्यात पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती लागू होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. आणखीही काही निर्बध येण्याची शक्यता दिसत आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने विविध निर्बंधासह मास्क वापरण्याचे निर्बंध देखील मागे घेतले आणि दोन वर्षानंतर नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. कोरोनाची तिसरी लाट परतीच्या प्रवासाला लागल्यापासून चौथ्या लाटेची चर्चा सुरु होती आणि यात मतमतांतरे देखील होती. अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने भारतातही सावधगिरी बाळगण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या पण आता केंद्र शासनाने पुन्हा एकदा पत्र लिहून सावधानतेचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असून त्यात रोज वाढ होताना दिसू लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने पाच राज्यांना पत्र लिहून 'सावध' केले आहे.
केंद्र शासनाने पाच राज्यांना सूचना दिल्या असून यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश तसेच मिझोराम या राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र लिहिले आहे. कोरोनासंदर्भात आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जावेत अशी सूचना या पत्राद्वारे करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना संसर्गाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून आवश्य ती पावले उचलण्याबाबत राज्य शासनाला निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या बाबतीत सर्व प्रकारची खबरदारी घेतली जावी अशी स्पष्ट सूचनाच केंद्र शासनाने दिली आहे. त्यामुळे राज्यात काही निर्बंध येण्याची (Corona restrictions) शक्यता व्यक्त होत आहे.
मास्क सक्तीची शक्यता !
कोरोनाच्या पंचसूत्रीत मास्क हा अत्यावश्यक मानला गेला आहे त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुन्हा मास्क वापरण्याची वेळ येण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे. मास्क सक्ती मागे घेतली गेली त्यावेळी काही अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली होती. निर्बंध मागे घेतले तरी मास्क सक्तीचा असावा असे अभ्यासकांचे मत होते. (Possibility of mask restrictions in Maharashtra again) आता केंद्रानेच आदेश दिल्यामुळे येत्या काळात नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा मास्क दिसू लागण्याची अधिक शक्यता आहे.
राज्यात कोरोना वाढ !
महाष्ट्रात कोरोना संसार्गात वाढ होत असल्याचे रोज निदर्शनास येऊ लागले आहे. गेल्या २४ तासात १२७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७८ लाख ७६ हजार ०४१ एवढी झाली आहे. राज्यात आजवर १ लाख ४७ हजार ८३० नागरिकांचा कोरोनामुळे प्राण गेलेला आहे. राज्यात आता ६६० रुग्णांवर उपचार सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येत मात्र वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोरोना संपला नाही !
कोरोना कमी झाला आहे पण संपलेला नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नसली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कची सक्ती उठवली असली तरी जेष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा. कोरोनाच्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. खबरदारी म्हणून केंद्राने पत्र दिले आहे परंतु राज्यात सद्यातरी मास्कची आवश्यकता नाही असे टोपे यांनी सांगितले आहे.
दिल्लीत मास्क सक्ती लागू !
दिल्लीत कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असून आजपासून दिल्लीत मास्क ची सक्ती लागू करण्यात आली आहे. आजपासून प्रत्येक नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून मास्क नसेल तर पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕सोलापूरसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा !
- ⭕ पंढरपूर तालुक्यातून कुख्यात दरोडेखोराला अटक !
- ⭕ सोलापूर - पुणे महामार्गावर मोठा अपघात !
- ⭕ पंढरीत अपघात, प्रतिष्ठित व्यापारी ठार !
- ⭕पंढरीत गुणरत्न सदावर्तेविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !