कळंब : कष्टाने वाढवलेला ऊस जळून गेल्याच्या तणावात असलेल्या शेतकरी महिलेला हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला आणि पासष्ठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न बिकट झालेला असताना शेतकरी प्रचंड संकटात आला आहे. उसाला तोड येईना म्हणून एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या हाताने आपल्याच उसाला आग लावली आणि तेथेच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने शेतकऱ्यांत हळहळ आणि कारखान्याच्या विरोधात संताप व्यक्त होत असतानाचा उस्मनाबाद जिल्ह्यात आणखी एक विदारक घटना घडली असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना कळंब तालुक्यातील सौंदणा येथे घडली असल्याचे समोर आले आहे.
सौंदणा (अंबा) येथील दत्ता माणिकराव पाचपिंडे यांनी आपले चुलते भगवान यांचे शेत वाट्याने केले होते. अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे तीन एकर ऊस जळून गेला. यामुळे दत्ता पाचपिंडे यांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत तोड मिळावी म्हणून त्यांनी धडपड केली पण चार दिवस झाले तरी कुठल्याही कारखान्याची तोड मिळत नव्हती. ऊस तसाच शेतात उभा आडवा होता त्यामुळे दत्ता आणि त्यांच्या पासष्ठ वर्षांच्या आई अंजनाबाई माणिकराव पाचपिंडे हे दोघेही प्रचंड तणावात होते. हा तणाव असह्य झाल्याने अंजनाबाई याना हृदयविकाराचा झटका आला.
अंजनाबाई याना रुग्णालयात हलविण्यात आले परंतु त्यांचा मृत्यू झाला (Sugarcane burnt,Farmer woman dies of shock) आणि कुटुंबावर आभाळ कोसळले. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न राज्यात अत्यंत बिकट बनला असून एप्रिल मध्यावर आला तरी गाळप सुरु असून यापुढे देखील कारखाने सुरु राहणार आहेत पण शिवारातील उभा ऊस हळूहळू नुकसानीकडे जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. अत्यंत कष्टाने आणि मोठा खरंच करून शेतकरी ऊस पिकवीत असतो आणि उसाच्या मिळणार असलेल्या पैशावर त्याचे पुढचे आर्थिक नियोजन असते. पाचपिंडे यांच्याबाबत मात्र उसाचेही नुकसान झाले आणि आई देखील गेली, असे दुहेरी संकट उभे राहिले आहे.
आता तरी ऊस न्या !
एवढ्या घटना घडून देखील पाचपिंडे यांचा ऊस अजूनही शेतातच उभा आडवा पडलेला आहे परंतु कोणत्याही कारखान्याने तोड दिली नाही. पाचपिंडे यांच्या नावाने बिगरसभासद म्हणून नॅचरल शुगरकडे नोंद आहे पण नॅचरल शुगरने उसाचे उत्पादन लक्षात घेऊन बिगर सभासदांचा ऊस गाळप करायचा नाही असे धोरण निश्चित केले आहे. दत्ता पाचपिंडे हे येडेश्वरी शुगरचे सभासद आहेत पण 'येडेश्वरी' ने मालकानेच ऊस तोडून आणावा असे सांगितले आहे. घरात आईचा मृत्यू झालेला असताना आम्ही कसा ऊस तोडायचा ? असा सवाल त्यांनी केला असून ऊस मात्र तसाच शिवारात तोडणीची वाट पाहत आहे.
हे देखील वाचा :
- भाजप आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश !
- अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू !
- घरगुती वापराची वीज देखील महागली !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !