BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ एप्रि, २०२२

जबरदस्तीने वर्गणी मागितल्याने तिघाविरुद्ध गुन्हा !


सोलापूर : एका दुकानात बळजबरीने आणि धमकी देत वर्गणी मागितल्याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Crime) एकीकडे हे चित्र असतानाच दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक रुपयात पेट्रोल हा उपक्रम राबविण्यात आला. 


विविध सार्वजनिक उत्सव साजरे करताना वर्गणी गोळा केली जाते. अनके मंडळे प्रेमाने मिळेल त्या वर्गणीवर उत्सव साजरे करतात तर काही मंडळात बोटावर मोजणारे कार्यकर्ते व्यापाऱ्यांना धमकावत, दमदाटी करीत वर्गणी गोळा करताना दिसतात त्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी असते. सार्वजनिक उत्सवासाठी व्यापारी, दुकानदार वर्गणी देतातही पण मोठ्या रकमेचा आग्रह केला जातो तेंव्हा दुकानदार वर्गणी देण्यास नाखूष असतात आणि मग यातून वादविवाद होण्याची शक्यता निर्माण होते. सोलापुरात देखील असाच एक प्रकार घडला आणि वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


सोलापूर टेक्स्टाईल मार्केट दुकानात तिघांनी ३१ हजार रुपये वर्गणी बळजबरीने मागितल्याची तक्रार राजुराम खोत यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दिली आणि पोलिसांनी या तक्रारीनुसार चिंटू कांबळे याच्यासह दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती शाहू महाराज बहुद्देशीय सामाजिक संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि न्यू बुधवार पेठ या मंडळाचे चिंटू कांबळे आणि  त्याचे साथीदार सोलापूर टेक्स्टाईल या दुकानात गेले आणि यावेळी वर्गणीसाठी जबरदस्ती केली (Forced subscription, File a polioce-case) अशा प्रकारची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. 


वर्गणीस नकार 
सदर तिघांनी दुकानात जाऊन ३१ हजार रुपये वर्गणी मागितली. यावेळी दुकानात राजुराम खोत हे होते. वर्गणीसाठी खोत यांना जबरदस्ती करण्यात आली आणि तुझ्या मालकाला फोन लावून दे म्हणत वर्गणी मागितली. खोत यांनी त्यांना वर्गणी  देण्यास नकार दिला. वर्गणी न दिल्यामुळे तुझे दुकान चालवू देणार नाही अशा प्रकारची धमकी देण्यात आली आणि जबरदस्तीने ३१ हजार रुपयांची वर्गणी मागण्यात आली अशा प्रकारची फिर्याद खोत यांनी दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

  
रुपयात पेट्रोल !
सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक रुपया प्रतिलिटर दराने पेट्रोल देण्याचा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला आणि रुपयातील पेट्रोल घेण्यासाठी वाहनांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. डॉ. आंबेडकर स्टुडंट आणि युथ पँथर्स यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सद्या पेट्रोल १२० रुपयांवर गेल्याने पेट्रोल न परवडणारे झाले आहे आणि अशा परिस्थितीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे जोरदार कौतुक तर झालेच पण हे पेट्रोल घेण्यासाठी वाहनांची गर्दी झाली. (Petrol in one rupee) या अभिनव उपक्रमास अनेकांनी धन्यवाद दिले.



हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  



   



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !