पुणे : यावर्षीच्या पावसाबाबत भारतीय हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली असून सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने या आधीच आपला अंदाज व्यक्त केला होता आणि महाराष्ट्रासह देशात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दोन वेळा अंदाज व्यक्त केला आहे आणि दोन्ही अंदाजात या संस्थेने चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली होती. भारतीय हवामान खात्याचा (Indian Meteorological Departmen) अंदाज येणे बाकी होते. आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज जारी झाला असून यावर्षी मान्सून सामान्य राहणार आहे, ९६ ते १०४ टक्के पाऊस होण्याचा अंदाज या विभागाने व्यक्त केला आहे. एकूणच सर्वच हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थांनी यावर्षीचा पाऊस समाधानकारक असणार आहे असेच अंदाज व्यक्त केले आहेत त्यामुळे कडक उन्हाळ्यात ही दिलासादायक बातमी मिळाली आहे.
१९७१ ते २०२० या काळातील पावसाचा अभ्यास करून यावर्षीच्या पावसाचे अनुमान काढण्यात आले असून यावर्षी पावसाची दीर्ध काळाची सरासरी ही ८७ सेमी राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे. ऑनलाईन पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी ही मोठी माहिती आज दिली आहे . (Normal rainfall in India this year) यावर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. देशातील सरासरी पावसाचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाकडून दोन टप्प्यात प्रसिद्ध करण्यात येत असतो यातील पहिल्या टप्प्यात एप्रिल महिन्यात तर दुसऱ्या टप्प्यात मे महिन्यात अंदाज प्रसिद्ध करण्यात येतो. प्रचलित दोन टप्प्यातील अंदाजाच्या धोरणात बदल करून देशातील नैऋत्य मोसमी पावसासाठी हंगामी आणि मासिक अंदाज प्रसिद्ध करण्यासाठी नवे धोरण अमलात आणले गेले असल्याचे डॉ. मोहपात्रा यांनी सांगितले आहे.
मान्सून सामान्य
१९७१ ते २०२० या काळातील पावसाचा अभ्यास करून हवामान विभागाने यावर्षीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर महिन्यात देशात पावसाचे प्रमाण सामान्य राहणार आहे. देशातील काही भागात सामान्य ते सामन्यापेक्षा अधिक पाउस होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. ईशान्य भारत, उत्तर भारत, दक्षिण द्वीपकल्पीय दक्षिण भागात मात्र काही भागात सामान्य ते सामन्यापेक्षा कमी पाऊस होण्याचे अनुमान आहे.
स्कायमेटचा अंदाज
स्कायमेट ने देखील आपला अंदाज जाहीर केला असून भारताला दिलासा देणारा हा अंदाज ठरला आहे. देशात जून ते सप्टेंबर या काळात मान्सून सरासरीच्या ९८ टक्के राहणार असल्याचा हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात पाच टक्क्यांचा कमी अधिक फरक होऊ शकतो. या आधी स्कायमेट या संस्थेने फेब्रुवारी महिन्यात अंदाज व्यक्त केला होता त्यावेळीही यावर्षीचा मान्सून सामान्य असणार असेच सांगण्यात आले होते आणि आज जारी केलेल्या अंदाजात देखील पूर्वीच्या अंदाजाप्रमाणेच पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
जून महिन्यात दमदार
असा असले उत्तरार्ध
पूर्वार्धात उत्तरार्धापेक्षा अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून महिन्यात ७० टक्के सामान्य पावसाचा अंदाज असला तरी जुलै महिन्यात तो ६५ टक्के, ऑगष्ट महिन्यात ६० टक्के आणि सप्टेंबर महिन्यात २० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाला असतानाच सलग दुसऱ्या वर्षीही समाधानकारक पावसाचे अंदाज येत आहे त्यामुळे शेतकरी वर्गासाठी सुखावणारा हा अंदाज आलेला आहे.
हे देखील वाचा :
- जबरदस्तीने वर्गणी मागितल्याने गुन्हा दाखल !
- भाजप आमदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा !
- वारकऱ्यांच्या गाडीला तिसरा अपघात, दोन ठार !
- इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात !
- उजनी कालव्यात पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !