BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ एप्रि, २०२२

इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात !

 



जालना : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला रात्री अपघात झाला असून सुदैवाने इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना या अपघातात इजा झाली नाही. 

राज्यात सर्वाधिक प्रसिद्धी मिळविलेले निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाला मोठी मागणी असते आणि या निमित्ताने ते राज्यभर प्रवास करीत असतात. त्यांचा असाच प्रवास सुरु असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. इंदुरीकर महाराज हे आपल्या गाडीने बदनापूर त्येथून खांडवीकडे निघाले होते यावेळी रस्ता ओलांडत असताना एका ट्रॅक्टरवर स्कार्पिओ आदळून हा अपघात झाला. जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर अपघाताची ही घटना घडली आहे. हॉटेल मधुबनच्या समोरील रस्ता ओलांडणाऱ्या ट्रॅक्टरवर महाराजांची स्कार्पिओ आदळली. (Accident to Indurikar Maharaj's Scorpio) हा अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. अपघाताचे स्वरूप मोठे  नसल्याने महाराजांना या अपघातात सुदैवाने इजा झाली नाही. 


काळ्या रंगाची स्कार्पिओ (एम एच १२ टी वाय १७४४) घेऊन निवृत्ती महाराज इंदुरीकर निघाले होते. महाराजाना या अपघातात इजा झाली नसली तरी त्यांच्या गाडीचा चालक संजय गायकवाड हा मात्र किरकोळ जखमी झाला आहे. जखमी झालेल्या चालकाला लगेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कार्नाय्त आले आणि इंदुरीकर महाराज याना दुसऱ्या एका वाहनाने खांडवी येथे पोहोचविण्यात आले. खांडवी येथे त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि नियोजनाप्रमाणे हे कीर्तन संपन्न देखील झाले आहे. इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

हे देखील वाचा : 



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  

     





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !