सातारा : माण खटावचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष जयकुमार गोरे ( ( Jayakumar Gore) यांच्यावर ऍट्रॉसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी, नेते यांच्याविरोधात राजकीय गुन्हे दाखल होत असतात पण एका लोकप्रतिनिधींवर भारतीय दंड विधान कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या या घटनेने सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा आरोप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर ठेवण्यात आला असून या आरोपासह ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. दहिवडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून यामुळे आता आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून आमदार गोरे यांच्यासह दत्तात्रय गोरे, महेश भोराटे आणि अन्य काही जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती दहिवडी उप विभागीय पोलीस अधिकरी निलेश देशमुख याची दिली आहे. ऍट्रॉसिटी अंतर्गत कलम ३ अ आणि भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६७ आणि ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्यकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट क्रमांक ७६९ मधील अल्पभूधारक शेतकरी मयत आहे परंतु त्याला जिवंत असल्याचे दाखवत जमिनीचा दस्तऐवज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप आमदार गोरे यांच्यासह चौघांवर करण्यात आला आहे. (Cheating and atrocities Case file against BJP MLA) जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध यापूर्वी देखील विनयभंगाचा एक गुन्हा दाखल झालेला होता.
हे देखील वाचा :
- वारकऱ्यांच्या गाडीला तिसरा अपघात, दोन ठार !
- इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात !
- उजनी कालव्यात पंधरा वर्षाचा मुलगा बेपत्ता !
- आमच्या नादाला लागू नका ! संभाजी ब्रिगेडचा इशारा !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !