BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० जाने, २०२४

"यांच्या"साठी मी माझ्या मुलीला बाजूला ठेवले पण--- शरद पवार यांनी बोलून दाखवली मनातील खंत !

 


शोध न्यूज : "यांच्या"साठी मी माझ्या मुलीला बाजूला ठेवले पण  तरीही काही लोक राष्ट्रवादीला सोडून गेले असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी  मनातील खंत पहिल्यांदा उघड केली आहे. ज्यांना मोठं केलं त्यांनीच दगा दिल्याने पवारांचे मन किती हळहळले असेल याचीच प्रचीती या विधानातून व्यक्त होत आहे.


शिवसेनेतून गद्दारी झाली आणि त्यानंतर राष्टवादी कॉंग्रेस पक्ष देखील फोडण्याचे काम झाले. या दोन्ही घटनामधून राज्याचे राजकारण किती खालच्या पातळीला गेले आणि संविधानाकडे कसे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले हे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र पहात आहे. राजकारणाची पातळी पूर्णपणे ढासळून गेली असून याला कोण जबाबदार आहे याची माहिती उभ्या महाराष्ट्राला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी राजकीय संस्कृती नष्ट करण्याचे काम करण्यात आले आहे. सामन्य जनतेत देखील याबाबत चीड असून, निवडणुकीत मतदानातून ही चीड व्यक्त होण्याची स्पष्ट शक्यता व्यक्त होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही ढोल वाजवला तरी, महाराष्ट्राचा मूड काही वेगळाच असल्याचे सोशल मीडियातून दिसत आहे,  राष्ट्रवादी पक्ष फोडून त्या पक्षावर हक्क सांगण्याचा प्रयत्न फुटीर नेत्यांकडून होत आहे.  राष्ट्रवादीच्या फुटीबाबत आधी अनेकांची वेगवेगळी मते होती, शरद पवार यांनीच हे राजकारण केले असल्याचे आरोप देखील होत होते पण आता यातील सत्यता जनतेच्या समोर आलेली आहे.


राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार यांना निश्चितच मोठा धक्का बसलेला असला तरी त्यांनी तसे दाखवले नाही की काही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एकीकडे त्यांचे पुतणे अजित पवार हे जाहीर साभामधून शरद पवार यांच्यावर टोकाची टीका करीत राहिले, पुन्हा पुन्हा शरद पवार यांच्या वयाबाबत भाष्य केले आणि त्यांनी आता निवृत्त व्हावे असे आवाहन केले. अर्थात महाराष्ट्राला हे पटले नसून, जनतेची सहानुभूती शरद पवार गटाला मिळत आहे, त्याचा फायदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीत उठलेल्या वादळात देखील शांत असलेल्या शरद पवार यांच्या मनात मात्र अनेक वादळे असल्याचे दिसत होते. 'सुनील तटकरे यांनी माझे घर फोडले आहे, त्याला गाडायचे आहे' असे पवार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटल्याचे जेष्ठ नेते अनंत गिते यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत सांगितले होते . त्यानंतर आता पहिल्यांदाच शरद पवार यांच्या मनातील खदखद बाहेर येताना दिसली आहे.


मी माझ्या मुलीला बाजूला ठेवले आणि इतरांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या पण तरीही काही लोक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडून गेले. हे जनतेला आवडलेले नाहीच. 'केंद्र आणि राज्यात मी पन्नास  वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत आणि विरोधात होतो. माझी कन्या सुप्रिया तीन वेळा खासदार झाली. तिला उत्कृष्ठ संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तिच्याकडे कर्तुत्व आणि नेतृत्व आहे. असं असताना मी स्वत: हिंगोलीच्या सुर्यकांता पाटील, माझे सहकारी पीए संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढे केलं, माझ्याबरोबर असणाऱ्या इतरांना सत्तेत मोठमोठी जबाबदारी दिली, मात्र माझ्या मुलीला मी बाजूला ठेवलं. (Sharad Pawar expressed his regret) एवढं करूनही राष्ट्रवादीला सोडून अनेक लोक बाजूला गेले, जनतेला हे आवडलं नाही, महाराष्ट्राची जनता अशा लोकांना मतपेटीतूनच बाजूला केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,' असे अत्यंत परखडपणे शरद पवार यांनी आपल्या मनातील भावन व्यक्त केल्या आहेत परंतु यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा साधा उल्लेख देखील केला नाही. गोविंदबाग येथे पदाधिकाऱ्याना निवडीची पत्र देण्यात आली. यावेळी शरद  पवार यांना राहवले नाही  आणि त्यांनी आपल्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !