शोध न्यूज : कुस्तीचा सराव केल्यानंतर त्रास होऊन पंढरपूर येथील पैलवानाचा कोल्हापूर येथे मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून कुस्ती विश्वावर शोककळा पसरली आहे.
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील शेतकऱ्याचा मुलगा कोल्हापूर येथे कुस्तीच्या सरावासाठी गेला होता. राज्यातून अनेक तरुण कुस्तीत करियर करण्याच्या हेतून कोल्हापूर येथे जाऊन नामांकित मल्ल्लाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करतात परंतु पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाला कुस्तीचा सराव केल्यानंतर मृत्यू आल्याचे समोर आले आहे. वाखरी येथील मारुती सुरवसे या पैलवानाने रात्री कुस्तीचा सराव केला आणि त्यानंतर अंघोळ करीत असताना त्याच्या छातीत दुखायला लागले. मारुतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु दुर्दैवाने त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा मृत्यू हृदय विकाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !