BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ फेब्रु, २०२२

मतीमंद मुलीवर अत्याचार, बारा वर्षांची शिक्षा !

 


सोलापूर : मतीमंद मुलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार करणाऱ्या नराधमास सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दंडासह १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून एक लाखाची भरपाई देखील देण्याचे आदेश दिले आहेत.


सोलापूर येथे नरेश जनार्दन कोंडा हा नराधम आणि पिडीत मुलगी हे एकाच परिसरात राहतात. पिडीत मुलगी ही मतीमंद असल्याची माहिती या नराधमास होती. ही मुलगी आपल्या घराजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेली असता नरेश याने त्या मुलीचा ओढले आणि तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 'आईला सांगशील तर तुला मारून टाकीन' अशी धमकी देखील या नराधम नरेश कोंडा याने त्या मतीमंद मुलीला दिली. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात नरेश कोंडा याच्याविरोधात गुन्हा दाखला करण्यात आला होता. 


पोलिसांनी बारकाईने तपास करून नरेश कोंडा याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर या खटल्याची सुनावणी केवळ चारच तारखांत झाली. सुनावणीत सरकार पक्षातर्फे भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले होते. मुलगी मतीमंद असल्याने तशी साक्ष मानसोपचार तज्ञांनी देखील न्यायालयात दिली होती. या खटल्यात १३ साक्षीदारांच्या महत्वाच्या साक्षी न्यायालयात नोंदण्यात आल्या. डी.एन.ए.सॅम्पलचा न्यायावैधक प्रयोग शाळेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला होता. आरोपीविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा सिद्ध होत असल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. 


पीडित मतिमंद मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून मुलगी मतिमंद असल्याची माहिती आरोपीला होती. त्यामुळे त्याने तिच्या या अवस्थेचा गैर फायदा घेतला आणि अत्याचार केला. तिला ठार करण्याचीही धमकी दिली. वारंवार धमकावून तिच्यावर शशरीरिक अत्याचार केलेला आहे हा जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि आरोपीस दोषी मानले. याप्रकरणी आरोपी नरेश कोंडा याला १२ वर्षाचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक महिन्याचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. शिवाय भारतीय दंड विधान कलम ५०६ अन्वये एक महिना कारावास आणि पाचशे रुपये दंड अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास एक महिना अधिक कारावास या शिक्षेसह भरपाई म्हणून पीडितेस एक लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.      

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !