BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ एप्रि, २०२२

सुरक्षा कवच तोडून अज्ञात व्यक्ती शरद पवारांच्या व्यासपीठावर धावला !



जालना : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुरक्षा वाढविलेली असताना आज एका व्यक्तीने त्यांच्या अचानक त्यांच्या व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता आणि कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करीत होते त्यावेळी पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर काही कर्मचारी चालून गेले आणि त्यांनी चप्पल, दगडफेक केली. हे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचले असून हा एक कट होता असे समोर आले. यात जवळपास ११० पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहेच पण कटाच्या प्रकरणी एस टी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना देखील अटक करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला तरी पोलीस गाफील राहिले होते त्यामुळे हा विषय प्रचंड वादाचा ठरला आणि त्यानंतर पवारांच्या सुरक्षेत वाढ देखील केली आहे. 


शरद पवार यांचा सातारा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला पण त्यानंतर शरद पवार जळगावच्या दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांच्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज शरद पवार हे जालना येथील एका कार्यक्रमास उपस्थित राहिले असताना आणि सुरक्षा असताना देखील एक घटना घडली आणि यामुळे सुरक्षा यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. (Unknown person enters Sharad Pawar's platform) या कार्यक्रमास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.

 


आणि घटना घडली !

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी उभे राहिले आणि अचानकच एका व्यक्तीने व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला त्यामुळे खळबळ उडाली आणि तर्कवितर्क सुरु झाले. या व्यक्तीने व्यासपीठावर चढण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे असलेल्या पोलिसांनी लगेच त्याला पकडले आणि ताब्यात घेतले. अचानकपणे घडलेल्या या घटनेने चांगलाच गोंधळ उडाला आणि पोलिसांची देखील तारांबळ उडाली. 


सुरक्षा कवच भेदले !

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणानंतर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली असताना कार्यक्रम सुरु असतानाच सुरक्षा कवच तोडून ही व्यक्ती व्यासपीठावर आली. वेळीच त्याला पकडून व्यासपीठावर खाली आणले आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरक्षा असतना ही व्यक्ती व्यासपीठावर कशी गेली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


चौकशी सुरु !

अचानक व्यासपीठावर चढलेली व्यक्ती कोण आहे आणि ती कशासाठी वर चढून गेली याची चौकशी पोलीस करीत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले आहे. एस ती कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केल्याची घटना ताजी असताना आज हा प्रकार घडला असल्याने चिंता व्यक्त होत आहे.   



हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )



 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !     


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !