BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ मार्च, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील सात गुन्हे उघडकीस !



सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरोडे टाकलेल्या टोळीचा तपास पोलिसांनी लावला असून सात गुन्हे उघडकीस (Seven crimes uncovered) आले आहेत तर १९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. 


अलीकडील काळात सोलापूर जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे अशा गुन्ह्यात वाढ होताना दिसत असून नागरिक देखील चोरांच्या दडपणाखाली वावरत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (Solapur Gramin Police) मात्र मोठी कामगिरी यशस्वी केली असून एका दरोडेखोराच्या मुसक्या आवळून त्याच्याकडून मोठी माहिती मिळवली आहे. पाच आरोपी अजूनही बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील दरोड्यासह चपळगाव, हन्नूर, पानमंगरूळ, तडवळ, मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील घरफोडी अशा सात गुन्ह्याची उकल पोलिसांनी केली आहे. 


सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Solapur Crime Branch) ही धडाकेबाज कारवाई केली असून  नागरीकातून या कारवाईचे कौतुक होऊ लागले आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा आणि मोहोळ तालुक्यातील एका गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला असून १८ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.  पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करीत आरोपीचा शोध घेतला आणि  त्याच्याकडून अन्य आरोपींच्या माहितीसह चोरीतील माल देखील हस्तगत केला आहे. 


सनीदेवल अटकेत !   

शिरवळ (अक्कलकोट) येथे शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्या घरी सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, यावेळी शांताबाई यांच्या पतीला मारहाण करून ३ लाख १६ हजाराचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी सनीदिवाळ सुरेश काळे या २५ वर्षीय दरोडेखोरास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून पोलिसांनी माहिती काढली. यावेळी त्याने सात गुन्ह्याची कबुलीच दिली. उरलेले पाच आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पोलीस त्यांच्या शोधात असून लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जातील.  


३९ तोळे हस्तगत 

सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दरोडा आणि घरफोडीतील चोरून नेलेल्या ऐवाजातील ३९ तोळे सोन्याच्या दागिन्यासह ८० ग्राम चांदीचे दागिने असा १८ लाकः ७६ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला आहे. (Investigation of seven thefts in Solapur district) उरलेल्या पाच आरोपीच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यानाही गजाआड करण्यात यश येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


हे देखील वाचा :


अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !