कोरोनाची चौथी लाट येणार असल्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना धडकी भरवत असताना राज्य शासनाने आज सर्वात मोठा दिलासा दिला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे निर्बंध, नियम, संचारबंदी, जमावबंदी अशा विळख्यात प्रत्येकजण गुदमरून गेला आहे. विविध नियम आणि निर्बंध यामुळे आर्थिक चक्रे कोरोनाच्या गाळात एवढी रुतून बसली आहेत की ती आता सहजगत्या बाहेर काढता येणार नाहीत. तिसरी लाट आली आणि फारसा उपद्रव न देता परतीच्या मार्गाला लागली त्यामुळे दिलासा मिळाला असतानाच आता निर्बंधाच्या जाचातून देखील मुक्तता मिळू लागली आहे.
कोरोनाची चौथी लाट येण्याची चर्चा सुरु झाल्याने पुन्हा निर्बंधाचे फास आवळले जाण्याची मोठी भीती होतीच शिवाय सद्या कोरोनाचे आस्तित्व नगण्य असल्यामुळे निर्बंध हटविले जावेत अशी मागणीही पुढे येत होती. देशातून कोरोना आता हद्दपार होत असून दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठीच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. (Corona restrictions lifted by central government) त्यानंतर राज्य शासनाने आज हा सर्वात दिलासादायक निर्णय घेतला आहे.
शासनाने घेतला निर्णय !
गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरु होत असलेल्या नव्या वर्षापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय आज शासंनाने घेतला आहे त्यामुळे नव्या वर्षात महाराष्ट्र आता मोकळा श्वास घेणार आहे. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्बंधाबाबत निर्णय होणार होता त्याप्रमाणे दुपारनंतर झालेल्या या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले असले तरी आणि सक्ती नसली तरी मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
तरी काळजी घ्या !
एक नवी सुरुवात करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कोरोनाच्या कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठविण्यात येत आहेत परंतु भविष्य धोका होऊ नये म्हणून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे, आरोग्याचे नियम पाळून आपली आणि इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे आभार !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचे तसेच कोरोना काळात हिरीरीने सहभागी झालेल्या सगळ्या घटकांचे आभार मानले आहेत. राज्यातील डॉक्टर, फ्रंटलाईन कर्मचारी, आणि सर्व नागरिक यांनी कोरोनाशी लढताना राज्य शासनाच्या प्रयत्नाला एकमुखाने आणि एक दिलाने बळ दिले. सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सण उत्सव आणि समारंभाला मर्यादित ठेवले आणि संयम पाळला. पोलीस, अन्य प्रशासकीय यंत्रणा यांनी दिवसरात्र लढून कोरोनाचा मुकाबला यशस्वी केला याबाबत समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !