अकोला : राज्यात उष्णतेची लाट आलेली असतानाचा उष्णतेमुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या पाठोपाठ दुसऱ्याही शेतकऱ्याचा उष्णतेच्या लाटेने (Heat Stroke) बळी घेतला आहे.
अवकाळी पावसानंतर राज्यात उष्णतेची लाट आलेली असून काही जिल्ह्यातील तापमानात तर मोठी वाढ झाली आहे. ही लाट आणखी तीन चार दिवस कायम राहणार असून वाढत्या उन्हाने नागरिक हैराण झालेले आहेत. विदर्भात तर सूर्य आग ओकू लागला असून या लाटेबाबत हवामान विभागाने आधीच इशारा दिला होता. चंद्रपूर येथे तर सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून ४४.२ अंश सेलीअसपर्यंत इथला पारा गेला. सूर्याच्या अतिनील किराणामुले उष्माघाताच्या समस्या वाढू लागल्या असून ही उष्णता जीवावर बेतू लागली आहे. (Two Farmer dies due to Heatstroke)
दुसरा बळी !
उष्माघाताने अकोला येथे आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतला असल्याने तर अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सारकिन्ही येथील एका पन्नास वर्षे वयाच्या शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू होण्याची घटना घडली आहे. समाधान शामराव शिंदे या शेतकऱ्यास उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
तरुण शेतकऱ्याचा मृत्यू !
उष्णता वाढू लागताच जळगाव येथील तरुण शेतकऱ्याचा उष्माघाताने नुकताच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावाचे रहिवासी असणारे जितेंद्र संजय माळी या ३३ वर्षीय शेतकऱ्यास शेतात भर उन्हात काम केल्यानंतर उष्माघाताचा त्रास झाला आणि शेतातून घरी येत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला.
दक्षता घेण्याचे आवाहन !
सद्या सर्वत्रच तापमान वाढलेले असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. शक्यतो घराबाहेर न पडणेच अधिक चांगले ठरणार आहे परंतु जावे लागलेच तरी अधिक काळ उन्हात थांबू नये तसेच उन्हापासून संरक्षण करण्याचे उपाय करण्यात यावेत. शिवाय दिवसभर जास्तीत जास्त पाणी प्यावे असे डॉक्टर देखील सांगू लागले आहेत. वाढत्या तापमानात ही दक्षता घेणे आवश्यक बनले आहे.
हे देखील वाचा :
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !