BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ एप्रि, २०२२

सावकारी कर्जामुळे सालगड्याची आत्महत्या !

 


टेंभुर्णी : नापिकी आणि शेती परवडत नसल्याने सोलापूर जिल्ह्यात नुकत्यात दोन शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटना घडल्या असताना आता सावकारी कर्जामुळे एका शेतमजुराने आत्महत्या (Farm laborer commits suicide) केल्याचे समोर आले आहे. 


विदर्भ, मराठवाडा भागात आजवर हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक अडचण हेच या बहुतेक आत्महत्यामागील कारण आहे. या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी वारंवार आवाहन करण्यात येत असते शिवाय त्यासाठी काही उपाय योजना देखील शासन पातळीवरून होत असतात. शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात आढळून येत नव्हते पण अलीकडे सोलापूर जिल्ह्यातही अशा घटना घडताना दिसू लागल्या आहेत. हे एक मोठ्या चिंतेचे कारण देखील ठरू शकते.  पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात शेतकरी आत्महत्या करण्याचे दुर्दैवी प्रकार घडले असताना आत टेंभुर्णी येथे कर्जामुळे शेतमजुराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 


अक्कलकोट तालुक्यातील अंकलगी येथील २९ वर्षाचा तरुण नागेश सिद्धराम बिराजदार हा माढा तालुक्यातील चव्हाणवाडी (टेंभुर्णी) येथे दत्तात्रय महालिंग कोल्हे यांच्या शेतात सालगडी मजूर म्हणून काम करीत होता. ऑक्टोबर २०२१ पासून कामावर असलेल्या बिराजदार याने शेतमालक कोल्हे यांच्याकडून ७० हजार रुपये व्याजाने घेतले होते. (High interest rate lending) सात टक्के मासिक व्याजाने ही रक्कम असल्यामुळे या रकमेचे व्याज महिन्याला ४ हजार १०० रुपये होत होते. दरमहा एवढे मोठे व्याज देणे हे मजुरासाठी कठीण होते. दरमहिन्याला व्याजाची रक्कमच एवढी मोठी होत असल्यामुळे कर्ज कधी फिटणार याची बिराजदार याला चिंता लागलेली होती.  कर्ज फिटत नसल्याची त्याला काळजी लागली होती आणि याच काळजीतून त्याने शेतातच गळफास घेवून आपले जीवन संपवले.   

सुरज जाधव आत्महत्या 
पंढरपूर तालुक्यात मगरवाडी येथील सुरज जाधव ( Farmer Suraj Jadhav suicide) या तरुण शेतकऱ्याने देखील काही दिवसांपूर्वी विष प्रश्न करून आत्महत्या केली होती. शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा येणार नाही असे म्हणत त्याने आत्महत्या केल्याने प्रचंड ह्ळहळ व्यक्त करण्यात आली. जाधव याच्या आत्महत्येचा विषय विधानसभेत देखील उपस्थित झाला होता. या आत्महत्येने पंढरपूर तालुक्याला मोठा धक्का बसला होता. 

मोहोळ येथेही तेच !
सुरज जाधव या तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच मोहोळ तालुक्यात देखील नुकतीच अशी घटना घडली आहे. शेतात पैसे खर्च करूनही त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्याच्या निराशेतून अवघ्या २८ वर्षे वयाच्या मनोज राजाराम गायकवाड या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.  मोहोळ येथील गायकवाड वस्ती येथे त्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपल्या जीवनाचा शेवट केला. सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या करू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. 

---------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !