BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मार्च, २०२२

बार्शी आमदारांच्या मुलाच्या जीवाला धोका !



मुंबई : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांचा जीव धोक्यात असून अवैध व्यवसायाला विरोध केल्याने त्यांना सोलापूर जिल्हा पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanavis) यांनी आज विधानसभेत सांगितले. 



बार्शीचे आमदार राजेंद्र राउत यांनी सोलापूर जिल्ह्यातील बेकायदा धंद्याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. अवैध व्यवसायासह त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. सोलापूर पोलीस कशा प्रकारे वसुली करीत आहेत याबाबत देखील त्यांनी  वेळोवेळी सांगितले आहे. त्यांच्या या आरोपाची जिल्हाभर (Solapur District) चर्चा होत असतानाच आज थेट विधानसभेत हा विषय पुढे आला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. 



आमदार राजेंद्र राऊत (Barshi MLA Rajendra Raut) यांना सोलापूर जिल्हा पोलिसाकडून टार्गेट केले जात आहे, तुमच्या मुलावर गुन्हा दाखल करणार, तुमच्या मुलाला फसवणार असे सांगितले जात असून आजही त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात आहे. अपक्ष निवडून येवूनही ते आमच्यासोबत आहेत म्हणून त्यांच्यावर डूख धरला जात आहे असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी देखील अवैध व्यवसाय आणि  पोलीस यांच्याबाबत विधानसभेत आवाज उठवला होता. ( Danger to the life of MLA Rajendra Raut's son) आ. राजेंद्र राऊत यांनी मात्र हा विषय लावून धरलेला असल्याचे दिसत आहे. 


सोलापुरात सचिन वाझे !  

सोलापूरमध्ये एक सचिन वाझे असून हा क्राईम ब्रँचसाठी ६० लाख गोळा करतो,  त्याचे स्टिंग ऑपरेशन झाले असून योगेश पवार यांनी याबाबतची क्लिप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री वळसे  याना देखील पाठवलेली आहे.  याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील तक्रार देण्यात आली आहे, पोलीस आयुक्त यांनी देखील याची चौकशी करण्याची घोषणा केली पण पुढे काहीही  झालेले नाही असे फडणवीस यांनी सांगितले.     



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !