पंढरपूर : अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पळवून नेवून तिच्याबरोबर केलेल्या लग्नाची खबर पोलिसांना (Pandharpur Crime) लागताच मुंबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनवली येथील तरुणास पोलिसांनी पकडले आणि पळून जाण्याचा बेत फसला.
पंढरपूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केले असल्याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली होती आणि त्यानुसार पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला होता. (Child marriage) पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील सचिन बाळासाहेब भोसले याच्या विरोधात फिर्याद देण्यात आलेली होती. त्यानुसार सचिन भोसले याने अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आणि सचिन भोसले हा सांगली जिल्ह्यातील औंढी (ता. जत) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पंढरपूर पोलिसांना आपली माहिती मिळाली असल्याचे सचिन भोसले याला समजले आणि त्याने तेथून निघून जाण्याचे नियोजन केले. (Kidnapping and marrying a minor girl) अल्पवयीन मुलीला घेवून मुंबई गाठण्याचे त्याने नियोजन केले पण पोलिसांनी त्याला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या चौकात गाठले आणि ताब्यात घेतले. ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने सदर अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याची बाब समोर आली त्यामुळे आधीच दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी बालविवाह आणि पोक्सो कायद्यांतर्गत कलमांची वाढ केली आहे.
मदत करणाऱ्यान अटक
सदर प्रकरणी सचिन भोसले याला मदत करणाऱ्याना अटक करण्यात आली आहे. आरोपीस बालविवाह करण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून सचिन भोसले याचा मोठा भाऊ नितीन बाळासाहेब भोसले, आई नंदा बाळासाहेब भोसले, नातेवाईक योगेश बापू भोसले, आविष्कार उर्फ अविनाश तुकाराम पाटील (सर्व रा. अनवली) यांना अटक करण्यात आलेली आहे.
डाव फसला !
अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिच्याशी लग्न करण्याचा डाव यशस्वी झाला पण पोलिसांपासून पळून जाण्याचा डाव मात्र फसला गेला. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांनी आरोपीची माहिती काढली होती आणि याची खबर आरोपीला लागली होती. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच मुंबई गाठण्याचे नियोजन आरोपीने केले पण पोलीस सतत त्यांच्या माहितीवर असल्याने मुंबईला जाण्याआधीच पोलिसांनी गाठले आणि मुंबईकडे जाण्याचा डाव फसला गेला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !