BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑग, २०२२

दक्षिण सोलापूरच्या दोन्ही ग्रामपंचायतीत भाजपाला धक्का !




सोलापूर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षात विभागणी दिसत असली तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील निकालाने भाजपला जोरदार धक्का दिला असून माजी मंत्री सुभाष देशमुख यांनाच हा हादरा मानला जात आहे. 


भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिमा इतर नेत्यापेक्षा निश्चित वेगळी आहे. त्यांचे राजकारण देखील सुसंस्कृत असल्याचे अनेक वेळा जनतेने पहिले आहे. सोलापूर जिल्ह्याची भाजपा म्हटले की सुभाष देशमुख यांचेच नाव समोर येते असे त्यांच्या कार्यही आहे पण दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना मोठा दणका बसला असल्याचे दिसत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि मनगोळी या दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा धुरळा उडाला आहे. अर्थात ग्रामपंचायत निवडणुका या पक्षापेक्षा स्थानिक पातळीवरील सोईनुसार होत असतात. त्यामुळे निवडणूक निकाल थेट पक्षाशी जोडणे संयुक्तिक होत नसते. असे असले तरी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लावली जाते आणि त्यांच्या नावावर निवडणूक लढविण्यात येत असते. 


राज्यातील राजकारणात सत्तेचा धुरळा उडालेला असताना आणि शिंदे गटाकडे इनकमिंग सूरु असल्याचे सांगितले जात असताना चिंचपूर ग्रामपंचायत एकहाती शिवसेनेकडे आली आहे. येथील सात पैकी सात जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्या आहेत, अर्थात ही ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली आहे. एकही जागा विरोधकाला मिळाली नाही हे विशेष मानले जात आहे. मानागोळी ग्रामपंचायत देखील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विजयी झाली आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत असूनही दोन्ही ग्रामपंचातीतून भारतीय जनता पार्टीला दूर व्हावे लागले आहे. (Big blow to Solapur BJP in Gram Panchayat elections)  शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे चिंचपूर ग्रामपंचायत गेली आहे. 


मनगोळी ग्रामपंचायत ही गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपच्या गटाकडे होती परंतु आता राज्यात सत्ता असतानाही भाजपला ही ग्रामपंचायत जिंकता आली नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यात दोनच ग्रामपंचायतिच्या निवडणुका होत्या आणि या दोन्ही ठिकाणी भाजप गटाचेच वर्चस्व होते परंतु यावेळी राज्यात भाजप सत्तेत असतानाही त्यांना या दोन्ही ग्रामपंचायत गमवाव्या लागल्या आहेत तर शिवसेनेत फुट पडल्यानंतरही चिंचपूर ग्रामपंचायतीमधील ७ पैकी ७ जागा जिंकून उद्धव ठाकरे यांना मोलाची भेट देण्यात आली आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला मात्र मोठी हार पत्करावी लागली आहे.  देशमुख गटाला हा फार मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. 


मनगोळी ग्रामपंचायतीवर काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षाने दिलेल्या पॅनेलच्या सहा पैकी पाच उमेदवारांनी विजय मिळवला आहे तर माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला केवळ आणि केवळ एकच जागा मिळाली आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायाने सुभाष देशमुख यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील या दोन्ही ग्रामपंचायतीपासून दूर व्हावे लागले आहे. त्यामुळे या दोन्ही निकालाची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी       येथे क्लिक        करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !