BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मार्च, २०२२

तिसरा अत्याचारी नराधम देखील गजाआड !

 



पंढरपूर : अल्पवयीन मुलीला माता बनवून अपत्य रस्त्यावर फेकून देलेल्या प्रकरणी तिसरा अत्याचारी नराधम देखील गजाआड करण्यात आला ( Pandharpur Crime) असून पोलिसांनी त्याला कराड येथून ताब्यात घेतले आहे. 


तासा दोन तासापूर्वी जन्मलेले मुल रस्त्याच्या मधोमध फेकल्याचे प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचले असून या प्रकरणात पंढरपूर पोलिसांनी नेमका आणि जलद तपास करून संपूर्ण रहस्यभेद करण्याचे अत्यंत कौतुकास्पद काम केले आहे.  २० फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास फुलचिंचोली येथील नागनाथ वसेकर हे आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी मायाक्का चिंचणी येथे निघाले होते. त्यावेळी त्यांना नारायण चिचोली गावच्या परिसरात पाण्याच्या टाकीजवळच्या रस्त्यावर मध्यभागी एक नवजात अर्भक दिसले होते. त्यांनी आपली गाडी थांबवून पहिले असता हे बाळ एक ते दोन तासापूर्वी जन्मलेले असल्याचे दिसले होते. 


कुणीतरी मरण्यासाठी रस्त्यावर टाकलेलं बाळ वसेकर यांनी उचलून त्याला जीवदान दिले होते. पोलिसांना माहिती देवून हे बाळ रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आणि या तपासात एकापेक्षा एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सदर प्रकरणी अल्पवयीन कुमारी माता, तिचे आई वडील, तिचा भाऊ आणि रिक्षाचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तपासात पोलिसांच्या हाती नवनवी माहिती येऊ लागल्याने हे एकूण प्रकरण भलतेच धक्कादायक असल्याचे दिसून येवू लागले आहे. 


मुलगी अल्पवयीन 
अनैतिक संबंधातून जन्मलेले मुल कुणीतरी फेकून दिले असेल असे सुरुवातीला दिसणारे चित्र पुढे गंभीर होत गेले. अल्पवयीन मुलीवर एकाने नव्हे तर तिघांनी वारंवार अत्याचार केले आणि त्यातून हे मुल जन्माला आल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तीन अत्याचारी तरुणांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला तेंव्हा फेकलेल्या बालकाची माता ही अल्पवयीन असल्याचे उघड झाले आणि त्यानंतर पुढील प्रकरण उलघडत गेले. 


तिसराही गजाआड !
सदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे तिघे जण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे,  ईश्वर वठार येथील दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तिसऱ्याचा शोध सुरु केला. दरम्यान तिसरा आरोपी विशाल संतोष टापरे याला पोलिसांनी कराड येथे ताब्यात घेतले आहे. (sexual harassment on minor girl third accused arrested) त्याच्याकडून देखील आणखी बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे.


'पित्या' चा शोध !   
अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केले आहेत त्यामुळे जन्मलेल्या आणि फेकून दिलेल्या बाळाचा नेमका पिता कोण ? हा प्रश्न सद्या कायम असून डीएनए तपासणीतून याचे उत्तर मिळणार आहे. त्यासाठी बाळ, अल्पवयीन माता आणि अत्याचारी दोन आरोपींचे नमुने घेवून डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आता तिसरा आरोपीही सापडला असून त्याचेही नमुने पाठविण्यात येतील. 


पोलिसांचे कौतुक !
अर्ध्या रात्री रस्त्यावर सापडलेल्या एका नवजात बालकापासून सुरु झालेला पोलिसांचा तपास मुळापर्यंत गेला आणि अत्यंत जलद गतीने हा तपास करून मोठा रहस्यभेद पोलिसांनी केल्याने तालुक्यातून पोलिसांचे कौतुक होताना दिसत आहे. सद्या तालुकाभर याच घटनेची चर्चा असून पूर्व भागात हा विषय प्रचंड खळबळ उडवून देणारा ठरला आहे. पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक तपास केल्यामुळे (Rapid investigation by Pandharpur police) या घटनेतील पाळेमुळे खणून निघाली आहेत. 




अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !