सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नामांकित मल्ल, ऑल इंडिया चॅम्पियन आणि निवृत्त पोलीस अधिकारी सिद्धराम विश्वनाथ साखरे यांचे अपघाती (Solapur Accident) निधन झाले असून कुस्ती विश्वाला मोठा हादरा बसला आहे.
सोलापूर - हैद्राबाद महामार्गावर दोडी येथे जीप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आणि या अपघातात पैलवान साखरे यांचे निधन झाले आहे. पैलवान साखरे हे मृत्युसमयी ६२ वर्षांचे होते. सोलापुरात १९८० साली उपमहापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत बाला रफिक शेख यांच्यासोबत झालेल्या कुस्तीत ते विजयी झाले होते. कोल्हापूर येथे शाहूपुरी तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे घेतले होते. कुस्तीमध्ये ऑल इंडिया चॅम्पियन असलेले साखरे हे पोलीस दलात सेवेत होते आणि या सेवेत त्यांनी लक्षवेधी काम केले आहे.
पोलीस दलात ३४ वर्षांची सेवा करून ते सेवेतून सहाय्यक फौजदार या पदावरून ते अलीकडेच निवृत्त झाले होते. पुण्यातील गुंड गजा मारणे यांच्यासह अनेक गुंडांना वठणीवर आणण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. पोलीस दलाच्या सेवेत असताना त्यांनी अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले. बोरमणीसारख्या गावातून त्यांनी आपल्या कुस्तीला सुरुवात केली होती आणि त्यांची कुस्ती सर्वदूर गाजत राहिली. त्यांच्या अपघाती निधनाने कुस्ती विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ( Accidental death of a renowned wrestler in Solapur district) त्यांच्या या अपघाती निधनाने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !