टेंभुर्णी : सोलापूर- पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे झालेल्या अपघातात एका ट्रकने चिरडल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Accident Solapur Pune Highway) सडे ट्रकने अन्य काही वाहनानाही धडक दिली.
मुंबईहून सोलापूरकडे निघालेल्या स्कर्पिओतून आलेले काही जण टेंभुर्णी (Tenbhurni ) येथील हॉटेल जगदंबा येथे जेवणासाठी थांबले होते. जेवण झाल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या दोन महिलांना एका ट्रकने चिरडल्याने या दोनही महिलांचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील ५५ वर्षे वयाच्या जयश्री चंद्रकांत वरपे आणि ७५ वर्षे वयाच्या शांताबाई विठ्ठल चौरे या दोन महिलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. एका मालट्रकने या दोघींना तर चिरडलेच पण उभ्या असलेल्या एका मोटार सायकलला आणि तीन कारला देखील धडक दिली. यात या वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या अपघाताबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यतील बीबी दारफळ येथील जयंत पोपट साठे, नवनाथ नागनाथ माने, सागर यादव, जयश्री चंद्रकांत वरपे, शांताबाई विठ्ठल चौरे हे स्कर्पिओ ( एम एच १५, ए जे ०१००) घेऊन मुंबई येथील आजारी पाहुण्यास भेटण्यासाठी गेलेले होते. पाहुण्यांना भेटून ते परत सोलापूरकडे निघालेले असताना काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी येथे पोहोचले. टेंभुर्णी येथे आल्यानंतर जगदंबा हॉटेल येथे स्कर्पिओ थांबवली आणि हॉटेलमध्ये त्यांनी जेवण घेतले. जेवण आटोपून बाहेर आल्यानंतर अपघाताची ही घटना घडली.
हॉटेलमध्ये जेवण करून बाहेर आलेल्या जयश्री वरपे आणि शांताबाई चौरे या दोन महिला गाडीजवळ येवून थांबल्या होत्या. यावेळी पुण्याकडून वेगाने आलेला ट्रक थेट या महिलांच्या अंगावर आला. या दोन्ही महिलांना चिरडून हा ट्रक हॉटेलच्या समोर उभ्या असलेल्या एका मोटार सायकलला धडकला. ( Two women from Solapur killed in Tembhurni accident) याचवेळी तेथील अन्य तीन कारना देखील या ट्रकने जोराची धडक दिली त्यामुळे त्या वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या अपघाताने एकच गोंधळ उडाला. रात्रीच्या शांत वातावरणात अपघाताचा मोठा आवाजही झाला.
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी एकूण अपघाताची पाहणी केली. जयंत साठे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रक चालक संदीपान नवनाथ जगताप (गौरगाव, ता. कळंब जि. उस्मानाबाद ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक जगताप याला अटक करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !