BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२३

सावध रहा ! पंढरपूर शहरात चोर मोकाट सुटलेत !

 :


शोध न्यूज : पंढरपूर शहर आणि तालुक्यात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे एकाच रात्री चोरट्यांनी तीन दुकानांना लक्ष्य केले असून उपनगरी नागरिकांत तर चोरांची कायमच दहशत असते, ती आता या घटनांनी वाढीस लागली आहे.


पंढरपूर शहर आणि तालुक्यात होत असलेल्या चोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत, तालुक्यात पोलीस ठाण्यांची आणि पोलिसांची संख्या वाढली पण चोरांची संख्या कमी होताना दिसत नाही. पंढरपूर शहराची उपनगरे, तालुक्यातील करकंब परिसर, सुस्ते अशा काही परिसरात तर या आधीही चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पंढरपूर शहरातील उपनगरात तर चोरांची कायम दहशत मनावार घेवूनच नागरिक रात्री झोपत असतात . बंद असलेल्या घरांना तर निश्चितपणे टार्गेट केले जात आहे. शहरातील दुकाने देखील चोरट्यांच्या नजरेत असतात आणि त्यांनी तीन दुकानांना टार्गेट केल्याचे समोर आले आहे.  पंढरपूर शहरातील मोबाइल विक्रीची दोन दुकाने चोरांनी सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास फोडली, तर आणखी एक मोबाइल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे मोबाइल व मोबाइलचे इतर साहित्य चोरीला गेले आहे.


शहरातील शहा पेट्रोल जवळील अनेक मोबाइल दुकाने आहेत. त्या ठिकाणची शाहरुख मणेरी (रा. तांबोळी वस्ती, देगाव, ता. पंढरपूर) एस. एम. मोबाइल शॉपी व महेश साळुंखे (रा. सेंट्रल नाका, पंढरपूर) विठाई मोबाइल शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी आत प्रवेश केला आहे. यावेळी एस एम मोबाइल शॉपी या दुकानातील जवळपास अडीच लाखांचे मोबाईल तर विठाई मोबाईल शॉपी या दुकानातील जवळपास पन्नास हजारांचे साहित्य चोरांनी चोरून नेले आहे.  दुकान मालकाने तीन लाख ते चार लाख रुपये किमतीचे मोबाइल घरी नेले होते. यामुळे फक्त दुकानात असलेले मोबाइल चोरीला गेला आहे.  विठ्ठाई मोबाइल शॉपीमध्ये जुने दुरुस्तीसाठी आलेले मोबाइल होते. ते मोबाइल चोरांनी घेतले होते. परंतु दुरुस्तीला आलेले हे मोबाईल चोरांनी फेकून दिल्याचे देखील दिसून आले आहे. सोहम कांबळे (पेहे) यांच्या सेल सेंटर मोबाईल शॉपीमधूनही चोरी करण्याचा प्रयत्न झाला पण सुदैवाने तो यशस्वी झाला नाही. कांबळे यांच्या दुकानात जवळपास पाच लाखांचे मोबाईल आणि अन्य साहित्य होते. चोरांचा डाव यशस्वी झाला असता तर कांबळे यांनाही मोठा फटका बसला असता.


पोलिसांनी या दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, त्यांचा तीन लोकांवर संशय बळावला आहे. दुकानच्या परिसरात तीन संशयित व्यक्ती वावरताना पोलिसांना दिसून आल्या आहेत. याच लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. (Another incident of theft in Pandharpur city) चोरीची एखादी घटना घडली तरी नागरिकांत घबराट निर्माण होऊ लागली आहे. दुकानासमोर दुचाकी लावून दुकानात जाणे, घराला कुलूप लाऊन परगावी जाणे देखील आता धोक्याचे बनले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !