BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ मार्च, २०२२

पंढरीत 'चौकीदार निकला चोर', डॉक्टरांच्या बांधकामावर मारला डल्ला !

 



पंढरपूर : बांधकाम साहित्याची चोरी होऊ नये म्हणून एका डॉक्टरांनी चौकीदाराची नेमणूक केली पण त्यानेच साहित्यावर डल्ला मारला (Padharapur Crime) आणि आयताच पोलिसांच्या कचाट्यात देखील सापडला. 


अलीकडे पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोरीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. कधी घरफोडी होऊन लाखोंचे दागिने लंपास केले जातात तर कधी भर रस्त्यावर पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केली जाते. एकीकडे पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करतात तर दुसरीकडे नवनव्या चोऱ्या होतच राहतात. वाढत्या चोरीचे प्रस्थ पाहता  नागरिक देखील जागरूक झाले असून आपल्या मालमत्तेचे सरंक्षण करण्यासाठी दक्षता घेत असतात पण आता चोरी रोखण्यासाठी नेमलेला चौकीदाराच चोरी करू लागल्याची एक घटना उघडकीस आली आहे.


पंढरपूर शहराचा विस्तार वेगाने होत असून जागोजागी नवी बांधकामे सतत सुरु असतात. या बांधकामावर महागडे साहित्य पडलेले असते आणि या साहित्यावर देखील चोरांचा डोळा असतो. बांधकामावरील साहित्य चोरीला जाऊ नये यासाठी देखील काळजी घ्यावी लागते. बांधकामासाठी लागणारे लोखंड तर सतत महाग होत चाललेले आहे त्यामुळे त्याची चोरी होणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. पंढरीतील एका डॉक्टरांनी आपल्या बांधकामावरील साहित्याची काळजी घेतली पण चौकीदारच चोर निघाला असल्याचे समोर आले. 


पंढरीतील डॉक्टर मनोज ज्योतिराम भायगुडे यांचे एक बांधकाम पंढरपूर येथील जुन्या बस स्थानकाच्या समोरच्या परिसरात सुरु आहे.  या बांधकामासाठी लागणारे लोखंड आणि अन्य साहित्य बांधकामावर असल्याने आणि त्यांची चोरी होऊ नये म्हणून राजू पवार नावाच्या व्यक्तीला कामगार म्हणून कामावर ठेवले होते. बांधकामावर सातशे ते आठशे किलो लोखंड ठेवलेले होते परंतु गेल्या महिन्यापासून येथील लोखंड कमी कमी होत असल्याचे डॉक्टराना जाणवले. (Steel theft on construction) शंका आल्याने त्यांनी बांधकामावर जाऊन पाहणी केली असता पाचशे किलो लोखंड नसल्याचे त्यांना आढळून आले. 


बांधकामावरील लोखंड गायब झाल्यामुळे डॉक्टरांनी कामावरील राजू पवार याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या दिल्यावर चोर चोरी करीत नाही असे म्हटले जाते पण येथे वेगळेच घडले होते. चोरी होऊ नये म्हणून ज्याची नेमणूक केली त्याच्याच विरोधात पोलिसात चोरीची तक्रार देण्यात आली. राजू पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी  त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (The theft was committed by the watchman himself) चौकीदारच चोरी करायला लागला तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर ? हा प्रश्न मात्र उभा राहिले आहे.      


अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !