पुणे : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असतानाच एक दिलासादायक बातमी आली असून महाराष्ट्रात यंदा चारही महिने पाऊस बरसणार (Mansoon Rain) असल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उन्हाळा सुरु झाला असताना आणि उन्हाची तीव्रता वाढू लागली असताना राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाउस होतोय आणि शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान करणारा ठरतो आहे. उन्हाळा सुरु झाला की आगामी पावसाळा कसा असेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागतात. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. धरणात पाणीसाठा मुबलक असून विहिरीमधूनही पुरेसे पाणी आहे. जमीनीतील पाणी पातळी टिकून असल्याने यावर्षी उन्हाळ्यात पाण्याची चिंता नाही आणि येणारा पावसाला भरपूर पावसाचा असेल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
हवामानाच्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येणारा पावसाळा हा चांगल्या पावसाचा असून दुष्काळ पडणार नाही. यावर्षीचा येणारा पावसाळा हा मागील दोन वर्षासारखाच असणार आहे आणि पावसाळ्याचे चारही महिने पाउस कोसळणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस असणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात देखील सामन्यापेक्षा चांगला पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चारही महिने धो धो पाऊस कोसळणार असून त्या पुढील काळात मात्र अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. मागील वर्षी पावसाळा संपल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि यामुळे मोठे नुकसान देखील झाले होते. अशीच परिस्थिती येत्या वर्षात होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षी महाराष्ट्रात सामन्यापेक्षा अधिक पाऊस झाला परंतु त्या आधीच्या काळात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा भागात सलग आठ वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीच्या अंदाजानुसार दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नसल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन हवामान विभाग हा आपल्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध असून त्यांच्या या अंदाजापाठोपाठ भारतीय हवामान विभागाचा देखील अंदाज येणार आहे. सद्याच्या अंदाजानुसार ९८ ते १०४ टक्के पाउस होणे अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभागाकडून अद्याप अंदाज व्यक्त करण्यात आलेला न असला तरी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हे अंदाज येण्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकरी बांधवासाठी शुभसंकेत असून चांगल्या होणाऱ्या पावसाळ्याला मान्सूनपूर्व पावसाची साथ लाभली तर शेतकरी बांधवाना मोठा दिलासा लाभणार आहे. (Good news for farmers) एक्यूवेकर या हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपनीने देखील यावर्षी भारतात दुष्काळ पडणार नसल्याचे म्हटले आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाने पावसाचे शुभसंकेत दिले असून शेतकऱ्यांच्या आशा या अंदाजाने पल्लवित झालेल्या आहेत. चांगले पर्जन्यमान राहिले तर कृषी उत्पादनात मोठी वाढ होते आणि शेतकरी अर्थसंपन्न होतोच पण त्यासोबत अर्थव्यवस्था देखील गतिमान होते. ( Satisfactory rainfall forecast for this year) आर्थिक घडी व्यवस्थित होण्यासाठी चांगले पर्जन्यमान कारणीभूत ठरत असून यावर्षीसाठी हवामान विभागाकडून आनंद आणि दिलासा देणारा अंदाज व्यक्त होऊ लागला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !