शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एक युवक गेल्या २२ दिवसांपासून रहस्यमय बेपत्ता (missing) झाला असून त्याचे कुटुंब चिंतेत आहे. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील ३२ वर्षे वयाचे रमेश बापू जाधव हे तरुण शेतकरी गेल्या २२ दिवसापासून बेपत्ता झाला आहे. कुटुंबिय आणि नातेवाईकानी सर्वत्र शोध घेवूनही त्याच्याबद्धल काहीही माहिती मिळू शकली नाही. शेती करून उपजीविका करणारा रमेश जाधव हा कुणालाही काहीही न सांगता २१ जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला तो परत आलाच नाही. घरातून जातानाही त्याने कुणाला काहीच सांगितले नाही. कुटुंबाने त्याची वात पहिली परंतु तो घरी न परतल्याने कुटुंब चिंतेत सापडले. त्यांनी लगेच रमेशची शोधाशोध सुरु केली परंतु तो कुठेच आढळून आला नाही. त्याला मानसिक आजार असून तो पंढरपूर येथील एका खाजगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार देखील सुरु आहेत. २१ जानेवारीस सकाळच्या सुमारास तो बाहेर पडला आणि घरी परत आलाच नाही त्यामुळे चिंतातूर झालेल्या कुटुंबाने नातेवाईक तसेच पंढरपूर शहरातील मठ, धर्मशाळा अशा सगळ्या ठिकाणी शोध घेतला परंतु त्याची काहीच माहिती मिळाली नाही.
शोधाशोध करूनही तो कुठेच सापडत नसल्यामुळे रमेशचे वडील बापू ज्ञानोबा जाधव यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात रमेश बेपत्ता असल्याची खबर दिली असून पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली आहे. (Farmer youth from Pandharpur taluka mysteriously missing) रमेशचा रंग सावळा, उंची पाच फुट, अंगात काळ्या हिरव्या रंगाचा चौकडा शर्ट, निळया रंगाची जिन्स, नाक पसरट, चेहरा गोल, डोळे मोठे, केस काळे, उजव्या हाताला गाठी असून तो मराठी भाषा बोलत असून कुठे आढळून आल्यास पंढरपूर तालुका पोलिसांना किंवा वडिलांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तब्बल २२ दिवस झाले तरी त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने आणि त्याच्या संदर्भात कसलीच माहिती मिळत नसल्याने गेल्या २२ दिवसापासून जाधव कुटुंब चिंताग्रस्त बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !