BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

चिता रचून, पूजा करून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या !

 



नागपूर : आपल्या हाताने आपलीच चिता रचून, पूजा करून वृद्ध शेतकऱ्याने याच चितेत उडी घेऊन आत्महत्या (Eighty year old farmer commits suicide) केल्याची अत्यंत दुःखदायक घटना घडल्याचे समोर आले असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 


आर्थिक अडचणीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. परंतु अत्यंत सधन असलेल्या या वृद्ध शेतकऱ्यांनी केलेली ही आत्महत्या चटका लावून गेली आहे. सधन कुटुंबातील आणि वारकरी संप्रदायातील आत्माराम मोतीराम ठक्कर या ८० वर्षे वयाच्या शेतकरी वृद्धाने आपल्या हाताने आपली चिंता रचून याच चिंतेत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतातील लाकडे गोळा करून या शेतकऱ्याने आपल्या हाताने आपली चिंता रचली, रचलेली चिता पेटवली आणि मग याच चिंतेत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला. आत्महत्या करण्यापूर्वी अध्यात्मिक स्वभावाच्या या शेतकऱ्याने चितेची देखील पूजा केली असल्याचे दिसून आले. ( Elderly farmer commits suicide ) 


भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठक्कर यांचे वडील असलेले हे वृद्ध शेतकरी अत्यंत धार्मिक होते. त्यांच्या मुलाची गॅस गोदामाच्या जवळच शेती आहे. या शेतीत ही घटना घडली. आत्माराम ठक्कर यांनी रात्री गावातील नाटकाचा आनंद घेतला आणि पहाटेच्या वेळी ते गावातील मंदिरात गेले. तेथे पूजा करून ते शेताकडे गेले. शेतातील लाकडे एकत्र करून त्यांनी आपल्या हाताने आपलीच चिता रचली . या चितेवर तणस पसरले. विड्याची पाने घेऊन त्यावर दिवे लावले आणि आपल्याच सरणाची पूजा देखील त्यांनी केली. त्यांनी विधिवत पूजा केली असल्याचे देखील घटनास्थळी स्पष्ट दिसून आले आहे. पूजेनंतर चिता पेटवून चितेत उडी घेतली असण्याची शक्यता व्यक्त केली गेली. 


सदर घटना उघडकीस आली तेंव्हा त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. चितेत आत्माराम ठक्कर यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला. अध्यात्मिक स्वभावाच्या वृद्धाने हे पाऊल कशासाठी उचलले असेल याबाबत काहीच माहिती उपलब्ध होत नाही. त्यांच्या श्वसननलिकेवर २००६ साली शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु हे दुखणे अजूनही त्रास देत होते अशी माहिती मिळत आहे. घटनेनंतर कुटुंब आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यावेळी त्यांनी हे करण्याचे चित्र पहिले. मुलाने तातडीने वेलतूर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरु केली. या घटनेने अनेकांना धक्का बसला असून प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !