बार्शी : घरातच मिनी कॅमेरे बसवून पत्नीवर पाळत ठेवून विवाहित महिलेचा छळ केल्याबद्धल बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीकडे सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी पाहायला मिळतात आणि चोरीसारख्या प्रकरणात ते अत्यंत उपयोगी पडतात. या कॅमेऱ्याची नजर कुणालाही सोडत नाही त्यामुळे अनेक गुन्हे कमी होत असून कुणी हिम्मत केली तर ते पुराव्यासह सापडले जातात. विज्ञानाचा चांगला उपयोग होतो तसे समाजात याचा वाईट कामासाठी देखील उपयोग करणारे काही असतात आणि एकाने आपल्याच पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी अशा कॅमेऱ्यांचा वापर केला असल्याचे समोर आले असून याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
बार्शी येथे एका महिलेने याबाबत आपल्याच घरच्या काही सदस्यांच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल केला आहे. बार्शी येथील शिल्पा शर्मा यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली असून पती निखिल शर्मा, दीर निहाल शर्मा, जाऊ नीलम शर्मा, आणि नणंदेचा पती प्रकाश खंडेलवाल (वजिराबाद) यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार केली आहे. सतत नशेत असलेल्या पतीकडून शिल्पा याना त्रास होत असून त्यांच्यावर संशय घेतला जात आहे. याच संशयातून पाळत ठेवण्यासाठी घरातच सीसीटीव्ही कॅमेरे लावून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केला जात असल्याची ही तक्रार आहे. बाहेरच्या जगात महिला सुरक्षित नाहीत हे तर रोजच दिसून येत आहे पण घरात देखील महिलेला सुरक्षेचे वातावरण नसून घरात देखील कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाळत (Installing cameras at home and watching his wife) ठेवण्यात येत असल्याचे हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
हे वाचा : वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा :

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !